दीपनगर वीज केंद्राच्या अधीक्षक अभियंत्यावर पाच हजाराची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा…
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव जिल्ह्यातील दीपनगर येथील महावितरणच्या औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या अधीक्षक अभियंता भानुदास लाडवंजारी यांच्यावर देयक मंजूर करण्यासाठी गुरूवारी पाच हजाराची लाच मागितल्या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
यातील तकारदार है एका कंपनीतर्फे दिपनगर औष्णीक विद्युत केंद्रातील २१० मेगावॅट क्षमतेच्या पॉवर प्लांटच्या ठिकाणी साईट सुपरवायजर म्हणुन कामास होते. सदर कंपनी तर्फे दि.२८.११.२०२४ ते दि.२८.०२.२०२५ दरम्यान २१० मेगावेंट पॉवर प्लाउंच्या तळाशी जमा होणारी राख उचलण्यासाठी, मोडतोड आणि तेलाचे चॅरेल काढण्यासाठी तसेच वाहतुक करण्यासाठी करण्यात आलेल्या कामाचे २,२८,५४४/- रुपयांचे बिल मंजुरीसाठी मुख्य अभियंता, बी.टी.पी.एस विभाग, दिपनगर यांच्याकडे पाठविले होते. सदरचे बिल मंजुर करून देण्याचे मोबदल्यात भानुदास लाडवंजारी यांनी तकारदार यांचेकडे एकुण २,२८,५४४/- रुपये बिलाच्या ५ टक्केप्रमाणे लाचेची मागणी करुन तडजोडीअंती ५०००/- रुपयांची लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने दि.२९.०४.२०२५ रोजी ला.प्र.वि. जळगाव घटकाचे सापळा पथकाकडे तक्रार लिहुन दिली होती.
सदर लाच मागणी तक्रारीची दि.२९.०४.२०२५ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता यातील आलोसे यांनी सदर कंपनीतर्फे दि.२८.११.२०२४ ते दि.२८.०२.२०२५ दरम्यान करण्यात आलेल्या कामाचे एकुण २,२८,५४४/- रुपये बिलाच्या ५ टक्केप्रमाणे लाचेची मागणी करून तडजोडीअंती ५०००/- रुपयांची लाचेची मागणी करून, सदर लाच रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शवून लाच मिळवण्याचा प्रयत्न करुन, स्वतः साठी भ्रष्ट व बेकायदेशीर मार्गान पैशांच्या स्वरूपात लाभ मिळविण्याची व्यवस्था करून गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन केले, म्हणुन भानुदास पुंडलीक लाडवंजारी, वय ५७ वर्षे, व्यवसाय नोकरी, अधिक्षक अभियंता औष्णिक विद्युत केंद्र दिपनगर, ता. भुसावळ जि. जळगांव खाते महाराष्ट्र राज्य विज निर्माती कंपनी दिपनगर, भुसावळ वर्ग-०१ रा.प्लॉट नं.३१ नेहरु नगर, जळगांव यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई सापळा व पर्यवेक्षण अधिकारी योगेश ठाकूर, पोलिस उप अधिक्षक, तपास अधिकारी हेमंत नागरे, पोलिस निरीक्षक, पाहेकॉ / किशोर महाजन, पोना/बाळु मराठे,पोशि/अमोल सुर्यवंशी, पोशि/प्रणेश ठाकूर, पोशि/ भुषण पाटील सर्व नेमणुक अॅन्टी करप्शन ब्युरो, जळगांव यांनी केली.

