मुक्ताईनगर तालुक्यात केमिकल युक्त बोगस ताडीची खुलेआम विक्री,अन्न औषध प्रशासनासह पोलिसांचे दुर्लक्ष?
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी (अक्षय काठोके ) मुक्ताईनगर तालुका भरात केमिकल युक्त बनावट ताडी निर्माण केली जात असून त्याची सर्रास विक्री केली जात असल्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील तरुण मुलांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून अनेक मुले व्यसनी झाली असून आणखीही मुलांना व्यसन जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे पोलीस, राज्य उत्पादन शुल्क व अन्न औषध प्रशासना कडून दुर्लक्ष केले जात असून त्यांनी या कडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. बनावट ताडी विक्रीतून शहरात व परिसरात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व कर्मचारी नेमणूक असलेल्या हद्दीत महिन्यातूनच एकदाच (पाकिटासाठी) साठी फेरी मारताना दिसत आहे.
मुक्ताईनगर शहर व तालुका भरात एकही ताडीचे झाड नसताना नेमकी ताडी येते कुठून?
मुक्ताईनगर शहरामध्ये अथवा तालुक्यात एकही ताडीचे झाड उपलब्ध नसताना ताडी हा नशेचा प्रकार कुठून येतो? याकडे पोलीस प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभागीय अधिकारी लक्ष देण्यास तयार नाही शासनाने ताडीचे लायसन जरी दिले असले तरी ज्या ठिकाणी ताडीचे वृक्ष आहे. ताडी संदर्भात लागवड केली जाते त्या ठिकाणाहून ताडी पोहोचायला किती वेळ लागेल? व ताजी ताडी किती वेळात पिणे योग्य आहे . ताडीचे नमुने वारंवार तपासली जात असता का? असे अनेक प्रश्न सुद्धा नागरिकांना पडलेला आहे जवळपास एकही ताडीचे झाड नसताना रोजच्या रोज एवढी ताडी येते तरी कुठून? या मागचे गोड बंगाल पोलीस प्रशासन व अन्न औषधी विभाग यांनी आता पर्यंत का शोधले नाही? या मागे अन्न- औषध वाल्यांचे चांगलेच आर्थिक देवाण-घेवानीचे हात भिजलेले असल्याचे तालुक्यात बोलले जात आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे गांभीर्याने लक्ष देतील का? व बनावट केमिकल युक्त ताडी मुक्त मुक्ताईनगर तालुका करणार का? ताडी विक्री वर कारवाई करणार का ? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे…..
सविस्तर बातमी वाचा पुढील भागात (2)

