भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

थोरगव्हाण येथील काल भैरवनाथ व महादेव मंदिरास आ.चंद्रकांत भाऊ पाटील यांच्याकडून ४५ लाख निधी मंजूर

थोरगव्हाण,ता.रावेर.मंडे टु मंडे न्युज. संतोष राणे सर | थोरगव्हाण येथील जागृत श्री कालभैरवनाथ मंदिर याच्या सर्वतोपरी विकासासाठी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री चंद्रकांत भाऊ पाटील यांचे सदैव सहकार्य लाभलेले आहे. त्यांच्याच प्रयत्नाने श्री कालभैरवनाथ मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा सुद्धा मिळालेला आहे व कालभैरवनाथ मंदिराचे सभामंडप सभागृहाचे व भक्त निवासाचे काम सुद्धा सुरू करण्यात आलेले आहे. आणि आता त्यामध्ये श्री चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या प्रयत्नांमुळे ४५ लाख रुपयांचा निधी कालभैरव मंदिर सुशोभीकरण व महादेव मंदिरासाठी मंजूर झालेला आहे.

श्री चंद्रकांत भाऊ पाटील यांची विधानसभा निवडणूक मध्ये आमदारपदी विजय झाल्यानंतर निवडणुकीमध्ये विजय झाल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी थोरगव्हाण येथील कालभैरवन नाथ महाराजांचे दर्शन घेतले होते त्यामुळे श्री चंद्रकांत भाऊ पाटील यांचे खास प्रेम व सहकार्य थोरगव्हाण ग्रामस्थांना नेहमी मिळत आलेले आहे. कालभैरव जयंती निमित्त चंद्रकांत भाऊंकडून समस्त भक्तांना सेविकाऱ्यांना थोरगव्हाण ग्रामस्थांना शुभेच्छा देण्यात आलेले आहेत. तसेच ग्रामस्थांतर्फे त्यांचे हार्दिक आभार मानण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!