भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

बँक कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रात मराठी बोलावेच लागणार

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना ग्राह‌कांशी अधिक घनिष्ट नाते निर्माण करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी महत्वपूर्ण असे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रात राहून मराठी बोलणार नाही, असे अरेराबीने बोलल्याच्या घटना बारंबार समोर येत असतात. विशेषतः सरकारी कार्यालयांमध्ये असे प्रकार पडले तर संतापजनक ठरले जाते. महाराष्ट्रातील बँकांमध्ये आता कर्मचाऱ्यांना ग्राहकांशी मराठीतच बोलावे लागणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी स्थानिक भाषांमध्ये बोलण्यासंदर्भात स्पष्ट शब्दात निर्देश दिले आहेत.

बँकांच्या शाखांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला त्या भागातील प्रादेशिक भाषेचे प्रेसे ज्ञान असणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे निर्देश दिले. त्यांच्या मते सिनिअर मॅनेजमेंटला स्थानिक भाषा येत नसली तरी श्रच मनेजर आणि कर्मचान्यांनी ग्राहकाच्या बोलीभाषेतच संवाद साधावा, तसेच भाषिक कौशल्यावर आधारित कामगिरी मूल्यमापनाच्चे शिफारस करण्याचीही त्यांनी तयारी दाखवली. भरती प्रक्रियेत सुधारणांची गरज

बँकिंग क्षेवतील नियुक्ती आणि मनुष्यबळ धोरणांमध्ये बदल आवश्यक आहेत, स्थानिक बोली बोलणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देऊन त्यांची निवड केली जावी आणि त्याना योग्य मान्यता मिळावी, असे त्यांनी सांगितले. विविध प्रदेशांत प्रादेशिक भाषा बोलणाऱ्या कर्मच्चयांची कमतरता ही गंभीर समस्या असून, त्याचे कोणतेही समर्थन होऊ शकत नसल्याचेही त्या म्हणाल्या, त्यामुळे बँकांना ग्राहकांच्या गरजा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतील आणि सेवा अधिक प्रभावी होईल, असे त्या म्हणाल्या. ग्राहकांशी वैयक्तिक संबंध कमी झाल्याचे परिणाम ग्राहकांशी वैयक्तिक संबंध कमी इाल्याने बँकांना कर्ज मूल्यांकनासाठी क्रेडिट माहिती संस्थांबर अवलंबून राहावे लागत आहे. या संस्था आकडेवारी अपडेट करण्यात वेळ घालवतात, ज्यामुळे अनेक पात्र व्यक्तींना कर्ज मिळत नसल्याची खंत निर्मला सितारमण यांनी बोलून दाखवली. पूर्वी बँक अधिकारी स्थानिक ग्राहकांना वैयक्तिकरित्या ओळखत असत आणि त्यांच्या विथासार्हतेची खात्री करत असत. आता ही पद्धत लोप पावली आहे, ज्यामुळे बैंकिंग प्रक्रिया अवघड झाल्याचे निर्मला सितारामण म्हणाल्या.

वैयक्तिक संपर्क जोडणे अनिवार्य
बैंक कर्मचाऱ्यांनी आधुनिक डिजिटल साधनांसोबत वैयक्तिक संपर्क जोडणे अनिवार्य आहे. राष्ट्रीयकरणापूर्वीच्या खासगी बँकांनी स्थानिक प्राक्कांसोबत मजबूत संबंध निर्माण करून यश मिळवले होते. उवजही हे तत्त्व लागू करून बँकांना व्यवसाय बाढवता येईल, तसेच स्थानिक भाषा आणि समजूतदारपणामुळे ग्राहकांची निष्ठा वाढेल आणि बँकांची प्रतिमा उजळेल, असा विश्वासही निर्मला सितारमण यानी व्यक्त केला.

देशातील सर्वाधिक आश्वासक संस्था बना

अजूनही अनेक लोक बँकांऐवजी व्याजखोरांकडून कर्ज घेतात, याबद्दल अर्थमंत्री सितारमन यांनी चिंता व्यक्त केली. अलीकडील दोन प्रकरणांच दखला देत त्यांनी बँकांना ग्राहकांप्रती अधिक सहानुभूतीपूर्ण असावे, असे सांगितले. कर्जदारांना बारंबार पुरावे आणि कागदपत्रे सादर करण्याची सक्ती न करता, छोट्या मुख्यांवर सुधारणा केल्यास बँका देशातील सर्वाधिक आश्वासक संस्था बनू शकतात, असे त्या म्हणाल्या.

तंत्रज्ञानाशी जोडून राहा
प्रादेशिक भाषा, मानवी संबाद आणि ग्राहकांच्या भावनांची जाणीव नसल्यास बैंकिंग यंत्रणा अपूर्ण राहते. तंत्रज्ञानासोवत मानवी घटक टिक्खून ठेवणे हेच यशाचे रहस्य असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले. यामुळे बँकांना ग्राहकांची सेवा अधिक चांगली करता येईल आणि अर्थव्यवस्था मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्थानिक भाषा म्हणजे नेमकी काय ?
ज्या गावात/शहरात बँकेची शाखा आहे, त्या भागातील मुख्य बोलीभाषा म्हणजेच महाराष्ट्रामध्ये मराठी, त्या शाखेतील कॅशियर, मॅनिजर, पीओ आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला तीच भाषा बोलता यायला हवी, जेणेकरून शेतकरी, ग्राहक आणि बँकेतील अधिकारी व कर्मचारी यांच्यामधील ट्युनिंग साधले गेले पाहिजेत, जेणेकरून आपसी दृढता निर्माण होऊन बँकेशी नाते जोडले गेले पाहिजेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!