विद्यार्थिनीवर बलात्कार, आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकासह अधीक्षिकेविरुध्द गुन्हा
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | चहा देण्याच्या बहाण्याने आश्रमशाळेच्या वसतिगृहाच्या अधिक्षिका विद्यार्थिनीला मुख्याध्यापकांच्या खोलीत पाठवीत असे या बहाण्याने मुख्याध्यापक त्या मुलीवर बलात्कार करीत असल्याची तक्रार करण्यात आली.
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील तलई येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. आश्रमशाळेच्या वसतिगृह अधिक्षिक ? च्या मदतीने तीन वेळा विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत धडगाव तालुक्यातील तलई येथे शासकीय आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आश्रमशाळेचे मुख्याध्यापक २०२४ पासून आपल्यावर बलात्कार करीत असल्याची तक्रार केली आहे. चहा देण्याच्या बहाण्याने आश्रमशाळेच्या वसतिगृहाच्या अधिक्षिका आपल्याला मुख्याध्याकांच्या खोलीत पाठवत होत्या. खोलीचे दरवाजे बंद करुन मुख्याध्यापक आपल्याशी गैरकृत्य करीत होते. कोणाला काही सांगिलत्यास मारण्याची धमकी देण्यात आली होती, असे तक्रारीत म्हटले आहे.
पोटात वेदना जाणवू लागल्यावर पीडितेने कुटूंबियांना कळविले. तिची आत्या आश्रमशाळेतून घरी नेण्यासाठी आली असता पीडितेला पाठविण्यात आले नाही. उलट छळ पीडिता ही आश्रमशाळेतून मध्येच मैत्रिणीकडे जाते, वसतिगृहाच्या नियमांचे पालन करीत नसल्याचे पत्र पालकांना देण्यात आले. पीडितेचा शारीरिक दिवसेंदिवस वाढत असल्याने अखेर पाच डिसेंबर रोजी ती घरी गेल्यानंतर तिने आईला तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती दिली. यानंतर इतर नातेवाईकांबरोबर १५ डिसेंबर रोजी धडगाव पोलीस ठाणे गाठून पीडितेने तक्रार दिली. त्यानुसार धडगाव पोलिसांनी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि वसतिगृह अधिक्षिका यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

