ओरिजनल पत्रकार संघ व गोदावरी फाऊंडेशन तर्फे पत्रकार दिनानिमित्त सावदा येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | दिनाक ६ जानेवारी २०२६ मंगळवार रोजी पत्रकार दिना निमित्त ओरिजिनल पत्रकार संघ सावदा, व गोदावरी फाऊंडेशन जळगाव यांच्या वतीने भव्य मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया सल्ला शिबिर रावेर तालुक्यातील सावदा येथे आयोजित करण्यात आले आहे.
ओरिजिनल पत्रकार संघ सावदा व गोदावरी फाऊंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यामाने हे भव्य आरोग्य शिबिर मंगळवार, दिनांक ६ जानेवारी २०२६ मंगळवार रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत, जेहरा मॅरेज हॉल, रावेर रोड, सावदा येथे आयोजित करण्यात आले असून, तज्ज्ञ वैद्यकीय पथकाद्वारे तपासणी, सल्ला आणि आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्यात येतील.
शिबिरात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मोफत उपचारांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे…रेशन कार्ड (पिवळे/केसरी/अन्नपूर्णा/अंत्योदय इ.), आधार कार्ड, ३.आयुष्यमान कार्ड (आयुष्यमान भारत कार्ड) तयार असल्यास त्याची प्रत.
शस्त्रक्रियांचे प्रकार
स्वादुपिंड (पॅनक्रियास) संबंधित शस्त्रक्रिया, छोट्या गाठी (ट्यूमर/सिस्ट) काढणे, मुळव्याध (पाइल्स), हायड्रोसिल, अंडाशय शस्त्रक्रिया, भांड (हर्निया) पित्ताशयाचे खडे (गॉलस्टोन), पायातील शिरा फुटणे (व्हेरिकोज व्हेन्स), मुत्रपिंडाचे आजार, पोट व आतड्यांच्या शस्त्रक्रिया आदी.
सावदा येथील ओरिजिनल पत्रकार संघाचे हे प्रयत्न ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा घराजवळ उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक ओरिजनल पत्रकार संघाचे अध्यक्ष भानुदास भारंबे, उपाध्यक्ष दिलीप चांदेलकर, सचिव शेख फरीद, कार्याध्यक्ष युसुफ शहा, कैलास लवंगडे, प्रसिद्धी प्रमुख अजहर खान, दीपक श्रावगे, शेख मुखतार, प्रशांत सरवदे, अकरम खान यांनी केले आहे.सदर शिबिरास नगरसेवक, अधिकारी, स्थानिक पत्रकार यांचे सह रावेर यावल तालुक्यातील पत्रकार उपस्थित राहणार आहेत- दिनाक ६ जानेवारी २०२६ मंगळवार रोजी पत्रकार दिना निमित्त ओरिजिनल पत्रकार संघ सावदा, व गोदावरी फाऊंडेशन जळगाव यांच्या वतीने भव्य मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया सल्ला शिबिर सावदा येथे आयोजित करण्यात आले आहे.


