शिल्पकलेच्या मास्टर डिग्रीच्या स्टुडन्ट एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत आर्यन पाटील याची पॅरिस (फ्रान्स ) येथे पुढील शिक्षणासाठी निवड
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | श्री स्वामिनारायण गुरुकुल संस्था सावदा येथील माजी विद्यार्थी चिरंजीव आर्यन नंदकिशोर पाटील यांचा सत्कार करण्यात आला .याप्रसंगी संस्थेचे संचालक श्री पी डी पाटील व संस्थेचे प्राचार्य श्री संजय वाघुळदे सर ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते .
याप्रसंगी गुरुकुलचा माजी विद्यार्थी चि . आर्यन नंदकिशोर पाटील हा महाराजा सयाजीराव गायकवाड युनिव्हर्सिटी, वडोदरा या ठिकाणी शिल्पकलेचे शिक्षण घेत आहे .या शिल्पकलेच्या मास्टर डिग्रीच्या द्वितीय वर्षाच्या पहिल्या सेमिस्टर ला स्टुडन्ट एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत आर्यनची निवड झाली व त्याला पॅरिस (फ्रान्स ) येथील जगप्रसिद्ध इकोल दि बोजा आर्ट या संस्थेमध्ये पुढील शिक्षणासाठी त्याची निवड करण्यात आली . 8 जानेवारी 2026 या दिवशी आर्यन फ्रान्सला रवाना होणार आहे. या पार्श्वभूमीवर श्री स्वामिनारायण गुरुकुल संस्था सावदा येथे त्याचा सत्कार आयोजित करण्यात आला होता .
याप्रसंगी आर्यनने त्याचा कलेचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडला व विद्यार्थ्यांना त्याने त्याच्या बोलण्यातून आव्हान केले की , आपल्या आवडीचे क्षेत्र निवडा व आपल्या मनाला रुचेल त्यामध्येच शिक्षण घ्या म्हणजे आपण प्रगती करू शकू . विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल असे विविध गोष्टी सांगत विद्यार्थ्यांना आर्यनने त्याच्या अनुभवातून मार्गदर्शन केले .
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शास्त्री स्वामी भक्तीप्रकाशदासजी यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून आर्यनचे कौतुक केले व त्याच्या यशाचे कौतुक करून त्याला शुभाशीर्वाद प्रदान केले चि . आर्यन हा श्री आ गं हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे कलाध्यापक श्री नंदू पाटील सर यांचा मुलगा आहे .
