बुलढाणा

ब्रेकिंग : देवदर्शनासाठी गेलेल्या मायलेकींचा पाय घसरून नदीत पडून मृत्यू

मलकापूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | आणखी एक दुखद घटना बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातून समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील विश्वगंगा नदीत बुडून मायलेकीचा मृत्यू झाल्याची दुख:द घटना समोर आली आहे. या दोघी नांदुरा तालुक्यातील निंबादेवी देवस्थान येथे गेल्या होत्या.

देवदर्शनाच्या निमित्ताने मायलेकी निंबादेवी देवस्थान येथे गेल्या होत्या. तेव्हा नदीत पाय घसरुन पडल्यांने दोघांची दुर्दैवी अंत झाला.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव तालुक्यातील मायलेकी देवदर्शनासाठी नांदुरा तालुक्यातील निंबादेवी देवस्थान येथे गेल्या होत्या. त्या वेळी त्या नदी जवळ गेल्या होत्या तेव्हा पाय घसरुन दोघी नदीत वाहून गेल्या. नदीत बुडून दोघींचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दोघींचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत.एकाच कुटुंबातील सात ते आठ जण पोहण्यासाठी उतरले होते. मलकापूर ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!