तापी नदी पात्रात आढळला एका इसमाचा मृतदेह
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | ८ सप्टेंबर रोजी अचानक बेपत्ता झालेल्या भुसावळ शहरातील गडकरी नगरातील न्यू राम मंदिराजवळ राहणारे प्रौढ इसम
इसमाचा मृतदेह गुरुवार दि. ११ सप्टेंबर रोजी अमळनेर शहराजवळील तापी नदीपात्रात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
भुसावळ शहरातील गडकरी नगरातील न्यू राम मंदिराजवळ राहणारे धनंजय दत्तात्रय ढंगे उर्फ बबलू (वय ४८) ही ८ सप्टेंबर रोजी रेल्वे परिसरातील कंटेनर यार्ड येथून अचानक बेपत्ता झाले होते. त्यांच्या पत्नीच्या खबरीनंतर ९ सप्टेंबर रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. त्याच दिवशी तापी नदी पुलावरून कुणीतरी उडी मारल्याची चर्चा अमळनेर शहरात होती.परंतु हतनूर धरणातून नदीपात्रात मोठा पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने शोध मोहिमेत काहीही निष्पन्न झाले नव्हते.
दरम्यान, ढेंगे यांचा अखंडपणे शोध घेत सुरू होता. अखेर दि. ११ सप्टेंबर रोजी अमळनेर जवळील तापी नदीपात्रात मासेमाऱ्यांना एक पुरुषाचा मृतदेह सापडला. त्यांनी अमळनेर पोलिसांना तत्काळ माहिती दिली. त्यानंतर भुसावळ येथून ढेंगे यांचे मित्र तेथे पोहोचले असता मृतदेह धनंजय उर्फ बबलू ढेंगे यांचाच असल्याचे ओळख पटली. धनंजय ढेंगे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वडील, एक भाऊ आणि एक बहिण असा परिवार आहे.

