लाच प्रकरणातील सह जिल्हा निबंधकांच्या जळगावातील घरात सापडले तीन कोटींचे घबाड : ४२२ ग्रॅम सोने, व लाखोंच्या प्रॉपर्टीची कागदपत्रे
जळगाव, मंडे टु मंडे न्युज | जळगाव मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) भ्रष्टाचार प्रकरणात अटक केलेल्या सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी (वर्ग-1) किरण पुरुषोत्तम चौधरी (साईप्रभा आर्केड, जळगाव) यांना दहा हजारांची लाच स्वीकारताना अलीकडेच अटक केली होती. विशेष म्हणजे जळगाव एसीबीने हे घर सील केल्यानंतर चौधरींच्या नातेवाईकांनी हे घर फोडण्याचा प्रयत्न केला मात्र सतर्क नागरिकांमुळे घरफोडी टळली होती. याच घरात आता एसीबीला कोट्यवधींचे घबाड सापडले असून या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे
अधिक सविस्तर माहिती अशी की, यातील किरण पुरुषोत्तम चौधरी, वय ५७ वर्ष, व्यवसाय नोकरी, सहजिल्हा निबंधक तथा मुंद्राक जिल्हाधिकारी, अकोला वर्ग-१ रा.प्लॉट नं.१०, साईप्रभा आर्केट, विष्णु नगर, खाजामिया रोड, जळगांव (खाते- मुंद्राक विभाग, वर्ग-१) यांनी तक्रारदार यांच्याकडुन १०,०००/- रुपये लाच रक्कम स्विकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आल्याने त्यांचे विरुध्द सिटी कोतवाली पो.स्टे. जि. अकोला येथे दि.२६.०६.२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर सापळा अधिकारी मिलींद कुमार बहाकर, पोलीस उपअधिक्षक ला.प्र. विभाग अकोला यांनी आरोपी किरण चौधरी यांचे राहते घर जळगांव येथे असल्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १८६ प्रमाणे ठराव पाठवुन घरझडती घेणे बाबत ला.प्र.वि. घटकास कळविले होते.
ला.प्र.वि., जळगांव कडील घरझडती पथक तात्काळ आरोपी मुद्रांक जिल्हाधिकारी तथा सह जिल्हा निबंधक
किरण पुरुषोत्तम चौधरी यांचे राहते घरी घरझडतीसाठी गेले असता सदरचे घर बंद होते. त्यावेळी सदर घर पंचांसमक्ष सिलबंद करण्यात आले होते. त्यादरम्यानच्या काळात दि.२८.०६.२०२६ रोजी रात्री ०२.०० वा. चे सुमारास किरण चौधरी यांचे नातेवाईक यांनी नमुद सिलबंद असलेले घराचे मागील गॅलरीचे दरवाजाचे कुलुप तोडुन घरफोडी करण्याच्या व पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आत प्रवेश केला होता, तेव्हा त्यांना ला.प्र.वि. जळगाव पथकाचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक पोलीस कर्मचारी यांनी रंगेहाथ पकडण्यात आले होते.
या प्रकरणी स्मिता नवघरे, ला.प्र.वि. जळगांव यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्याने जिल्हापेठ पो. स्टे. गुरंन २०७/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५(अ),३३१(२),२३८,६२ प्रमाणे आरोपी किरण पुरुषोत्तम चौधरी, वय ५७ वर्ष, व्यवसाय नोकरी, सहजिल्हा निबंधक तथा मुंद्राक जिल्हाधिकारी, वर्ग-१, अकोला, रा. फ्लॅट नं.०५, साईप्रभा आर्केड, विष्णु नगर, खाजामिया रोड, जळगांव (खाते मुंद्राक विभाग, वर्ग-१) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर दि.०२.०७.२०२६ रोजी आरोपी किरण चौधरी यांची पत्नी सौ. मनिषा चौधरी या जळगांव येथे हजर झाल्याने त्यांचेसमक्ष व दोन शासकिय पंच, गोल्ड व्हॅल्युअर, बैंक कॅशियर, डॉक्टर यांचेसमक्ष आरोपी किरण चौधरी यांचे राहते घरी साई प्रभा ऑर्केड, विष्णुनगर, जळगांव येथील घरझडती मध्ये वरप्रमाणे रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागीने, पावत्या व स्थावर प्रॉपर्टीचे कागदपत्रे मिळुन आले असुन ते जप्त करण्यात आले आहे.
किरण पुरुषोत्तम चौधरी, सहजिल्हा निबंधक तथा मुंद्राक जिल्हाधिकारी, अकोला वर्ग-१ यांचे घरामध्ये
१) १,५३,८४,६३०/- रू. रोख रक्कम,
२) ६०,५७,१३५/- रू. कि. अं. चे एकुण ४२२.१०० ग्रॅम सोन्याचे दागिने
३ ) ६२,१३,३७६ रू. किं. चे वेगवेगळया ठिकाणी आलोसे व त्यांचे कुटुंबियांचे नावे प्रॉपर्टी असल्याचे कागदपत्रे,
४) ३१,४१६/- रू.कि.अं.चे एकुण १५४.५०० ग्रॅम चांदीचे दागिने,
५) ११,५२,७४५ /- रू. किं. चे एकुण सोने खरेदी केल्याच्या पावत्या.
६) ६,२५,५४५/- रू. किं. च्या घरातील वस्तु.
अशा एकुण २,९४,६४,८४७/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला असुन तो जप्त करण्यात आला आहे.


