अल्पवयीन तरुणीला पळवून नेत वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | इयत्ता ९ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन तरुणीला पळवून नेत त्याच्यावर सुरत, उधना सह अनेक ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची घटना बोदवड तालुक्यातील एका गावात घडली. शेख नाजिम शेख साबीर (वय ३१, रा.भुसावळ, जाम मोहल्ला, ह.मु बोदवड) याने फुस लावून त्या तरुणीला दि. २४ रोजी पळवून नेत तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, बोदवड तालुक्यातील एका गावातील इ.९ वी शिक्षण घेत असलेली १५ वर्षीय तरुणी च्या
घराशेजारी बांधकाम सुरू होते. त्या बांधकामावर मजुर म्हणून काम करणाऱ्या शेख नाजिम शेख बशीर (वय ३१, रा. जाम मोहल्ला, भुसावळ, ह.मु. रा. म्हसोबा देवस्थान बोदवड) या तरुणाने दि. २४ रोजी रात्री ८ ते १२ वाजेदरम्यान अपहरण करुन त्या अल्पवयीन तरुणीला पळवून नेत सुरत, उधना यासह वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर संमती नसताना जबरजस्ती लैंगिक अत्याचार केला तसेच तिला सोडून पळून गेला.
या प्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून बोदवड पोलिसात सदर आरोपीवर पोस्कोसह ॲट्रासिटी कायदानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपी शेख नाजिम शेख बशीर (वय ३१, रा. जाम मोहल्ला, भुसावळ, ह.मु. रा. म्हसोबा देवस्थान बोदवड ) याला भुसावळ न्यायालयामध्ये हजर केले असता त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे..


