रावेर तालुक्यातील पुरी गोलवाडे परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ, बॅटरी, इन्व्हर्टर व इलेक्ट्रिक मोटर तारा चोरी
पुरी गोलवाडे, ता. रावेर. मंडे टू मंडे न्यूज. जीवन महाजन | रावेर तालुक्यातील पुरी गोलवाडे परिसरातील शेतकरी बांधव यांचे सह ग्रामस्थाना चोरट्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परिसरात चोरीचे प्रमाण वाढत चालले आहे.
दिनांक २९ ऑगस्ट च्या मध्य रात्री तापी पूर्णा टोल काटा पुरी गोलवाडे. या ठिकाणी चोरी झाली असून त्यामध्ये okya कंपनीचे बॅटरी व इन्व्हर्टर व किरकोळ रक्कम ची चोरी करण्यात आली. याआधी सुद्धा या ठिकाणी अशी चोरी झाली होती.
तसेच दिनांक २८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री धामोडी येथे श्री स्वामी समर्थ टोल काटा व ट्रेडर्स या ठिकाणी बॅटरी इन्वर्टर डीव्हीआर सीसीटीव्ही कॅमेरे यांची चोरी झाली. तसेच ३० ऑगस्ट च्या मध्यरात्री निंभोरा टोल काटा येथे चोरी करण्यात आली. त्याच प्रमाणे तांदलवाडी येथे टोल काट्यावर या पद्धतीची चोरी करण्यात आली. अशा लागोपाठ चोऱ्यांमुळे शेतकरी वर्गासह ग्रामस्थ धास्तावले आहेत.
चोरट्यांनी तापी नदीच्या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटर फोडून त्यातून तांब्याच्या तारिची चोरी करण्यात आली.प्रशासनाकडून या कडे दुर्लक्ष्य होत असल्याचा आरोप ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून केला जात आहे. प्रशासनाचे या कडे दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकरीच सर्व एकत्र येऊन शेतात आळीपाळीने देखरेख करण्याचा विचार करत आहेत.

