जीपीआरएस सिस्टीम मधून लाईव्ह लोकेशन व फोटो साठी अकोल्याहून सोडलेल्या दुर्मिळ गिधाड पक्षाला गोलवडे गावात दिले जीवदान
गोलवाडे, ता.रावेर.मंडे टू मंडे न्यूज, जीवन महाजन | रावेर तालुक्यातील गोलवाडे गावात गिधाड या पक्षाचे दर्शन झाले. तापी नदीच्या काठावर गोलवाडे या गावात मासेमारी हा व्यवसाय ठराविक लोक करत आहे. या गोलवाडे गावातील श्री शिवराम देवराम बेलदार यांचा मासेमारी व शेती व्यवसाय आहे आज दुपारी ठीक दोन वाजता शिवराम बेलदार नदीवर गेले नदीमध्ये मासे अडकण्यासाठी जाळ टाकलेलं होतं त्या जाळ्यामध्ये गिधाड हा पक्षी अडकलेला होता श्री शिवराम देवराम बेलदार यांनी व त्यांचे वडील देवराम बेलदार यांनी मोठ्या हिम्मतीने गिधाड पक्षी याला जाळ्यातून बाहेर काढलं.
गिधाड खूप तडपलेल्या अवस्थेत होता शिवराम बेलदारांनी गिधाडला पाणी पाजण्याचा व काही खाऊ घालण्याचा प्रयत्न केला पण पक्षी तळपलेल्या अवस्थेत असल्यामुळे काही खात पीत नव्हता बेलदार यांनी गिधाड पक्षाला घरी गावात आणले. गावातील लोकांची भरपूर गर्दी होऊ लागली कधी न पाहिलेला पक्षी पाहायला मिळाला तसेच उपसरपंच श्री संतोष भाऊ पाटील यांनी फॉरेस्ट अधिकाऱ्यांना फोन करून संपूर्ण माहिती दिली फॉरेस्ट कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यावरून श्री देवराम बेलदार यांनी पक्षाची निगा राखली तसेच गावातील लोक पक्षी पाहण्यास येत होते.
गिधाड पक्षी या पक्षावर जीपीआरएस ट्रेकिंग बसवलेले होतो त्याच्या दोघं पायांमध्ये फॉरेस्ट बिल्ले होते हा पक्षी अकोला रिसर्च सेंटर मधून सोडण्यात आलेले आल्याची माहिती मिळाली. गिधाड असे सोडण्याचे कारण असे होते की जंगलामध्ये खूप पक्षी मरण पावतात त्या पक्षांची पाहणी म्हणून फॉरेस्ट डिपार्टमेंट मधून हा गिधाड पक्षी जी पी आर ए ट्रेकिंग सह बिल्यासह जंगलात सोडण्यात आलेले आहे त्या जीपीआरएस सिस्टीम मधून गिधाड हा पक्षी त्यांचं लाईव्ह लोकेशन व लाईव्ह फोटो फॉरेस्ट डिपार्टमेंटला देत होता.
तसेच आमचे विद्यमान गोलवाडा उप सरपंच श्री संतोष भाऊ साहेबराव पाटील यांनी फॉरेस्ट अधिकारी यांच्याशी संपर्क साधला त्यांच्या सांगण्यावरून फॉरेस्ट कर्मचारी गिधाड या पक्षाला घेण्यासाठी येत आहे असा संदेश दिला.होते सरपंच श्री स्वप्निल भाऊ इंगळे. उपसरपंच श्री संतोष भाऊ पाटील. ग्रामपंचायत सदस्य गोपाळ दयाराम धनगर. रवींद्र चुनलाल तायडे. माजी सरपंच भाऊराव रामकृष्ण महाजन. श्री कमलाकर शिवाजी महाजन. श्री संजय विश्वनाथ तायडे. श्री योगेश बेलदार. युवराज भालेराव. रामा रेवजी तायडे. श्री रतिराम गणपत तायडे. श्री ईश्वर काशिनाथ तायडे. श्री हर्षल संजय तायडे व गावातील खुप लोक इत्यादी होते तसेच गोलवाडे गावातील उपसरपंच श्री संतोष भाऊ पाटील यांच्या सांगण्यावरून गिधाड या पक्षाला निंभोरा पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आले.
पोलीस स्टेशन मधील एपीआय श्री मीरा देशमुख यांनी परिपूर्ण मदत केली व आमचे मित्र शिवराम बेलदार यांनी फॉरेस्ट कर्मचाऱ्यांना सांगितलं की आम्ही गिधाड या पक्षाला निंभोरा पोलीस स्टेशन मध्ये घेऊन आलो आहे रावेर फॉरेस्ट डिपार्टमेंटचे कर्मचारी यांनी निंभोरा पोलीस स्टेशनला आले व गिधाड या पक्षाला ताब्यात घेतले फॉरेस्ट कर्मचाऱ्यांच्या माहितीवरून गिधाळ हा पक्षी जंगलामध्ये रिसर्च करण्यासाठी पाठवलेला आहे व ते वन विभागामार्फत सोडलेले आहेत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गिधाड पक्षाला सोडण्याकरता परत जंगलाच्या दिशेने सोडण्याकरता रवाना होत आहे असे त्यांनी सांगितले. असे या गोलवाडे गावात साक्षात या गिधाड पक्षाने दर्शन दिले……………..
