भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरशैक्षणिक

विकासाच्या नावा खाली सावदा कन्या शाळेच्या मैदानाची दुर्दशा, मुख्याध्यापिकेला कारणे दाखवा नोटीस ! सर्वच गुलदस्त्यात? काय आहे प्रकार?

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज | सावदा नगरपालिका संचालित श्री नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यामंदिर या कन्या शाळेच्या सुमारे ११ हजार चौरस फूट मैदानाच्या मजबुतीकरण, सौंदर्याकरण आणि विकास कार्याच्या नावाखाली मैदानाची पूर्णतः दुर्दशा झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या संदर्भात “मंडे टु मंडे न्युज” ने चौकशी केली असता सदर काम कोण करतंय? कोणत्या फंडातून ? निधी कुठला? एन ओ सी आहे काय? अशा अनेक प्रश्नांबाबत चौकशी केली होती त्या वेळी शाळे कडून तसेच मुख्याधिकाऱ्यांकडून कुठलीही माहिती देण्यात आली नव्हती. या बाबत कुणालाही काही माहिती नाही असे सांगण्यात आले होते. मात्र हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे गटनेते राजेश वानखेडे यांनी उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवड वेळी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा प्रश्न उपस्थित केला.या संदर्भात नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्या मंदिर कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका याना करणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

कन्या  शाळेच्या मुख्याध्यापिका यांना देण्यात आलेल्या पत्रात फक्त कंपनीचे नाव ‘एम/एस. के बिल्डकॉन सीसीएच, संभाजीनगर’ असा उल्लेख आहे. मात्र, ठेकेदाराचे पूर्ण नाव, पत्ता किंवा संपर्क क्रमांक याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. कामासाठीचा निधी कोणत्या योजनेचा आहे, याचा उल्लेखही नाही. तसेच, या कामाच्या अंदाजपत्रकाची माहिती शाळा प्रशासन किंवा नगरपालिका यांच्याकडे दिलेली नाही. विशेष म्हणजे, पालिकेकडून ना हरकत प्रमाणपत्रही घेण्यात आलेले नाही. प्रत्यक्षात हे काम कंपनीने स्वतः न करता, ‘शेख’ नावाच्या तृतीय व्यक्तीने सुरू केले असल्याची माहिती मिळाली आहे.

मुख्याध्यापिका पुष्पलता ठोंबरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘खलील शेख’ नावाच्या व्यक्तीने शाळेत येऊन मैदान मजबूत करण्याचे आणि विकासाचे काम सुरू केले. मात्र, त्यांनी कोणताही लिखित पुरावा, वर्क ऑर्डर किंवा अधिकृत कागदपत्रे दिली नाहीत. शेवटच्या दिवशी त्यांनी एक कागद सहीसाठी दिला, पण मी त्यावर सही केलेली नाही. त्यामुळे या कामाचे पेमेंट त्यांना मिळाले नसावे.’ त्या पुढे म्हणाल्या की, हे काम ‘समग्र शिक्षा अभियान’ अंतर्गत असावे आणि शेख यांना वरिष्ठ स्तरावरून हे काम मिळाले असावे. काम सुरू झाल्यानंतर १ ते १.५ महिने बंद पडले होते. मुलींची शाळा सुरू होणार असल्याने मी काम उत्कृष्ट दर्जाचे करण्याचे आणि मुलींना दुखापत होऊ नये याची काळजी घेण्याचे सांगितले होते.

मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा न केल्याने माझी चूक झाली, हे मी मान्य करते. परंतु, पत्रातील वर्णनानुसार काम झालेले नसून, उलट पूर्वीचे व्यवस्थित मैदानही उखडून टाकण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थिनींची गैरसोय होत असून, दररोजची प्रार्थना आणि खेळण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. २६ जानेवारीचा गणतंत्र दिवस जवळ येत असल्याने शाळा प्रशासनाची चिंता वाढली आहे. याचप्रमाणे, नगरपालिकेच्या दुसऱ्या शाळेतही असेच काम झाल्याचे समजते. तेथे काम पूर्ण झाल्याचा दाखलाही ठेकेदाराला देण्यात आला आहे, मात्र प्रत्यक्षात कोणतेही काम झालेले नाही. या दोन्ही शाळांच्या सुमारे एक कोटी रुपयांच्या कामांबाबत गंभीर अनियमितता असल्याचा संशय आहे. दरम्यान, नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्या मंदिरातील क्रीडांगणाबाबत मुख्याधिकारी भूषण वर्मा यांनी मुख्याध्यापिका ठोंबरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.  या प्रकरणात पारदर्शकता नसल्याचे आणि अधिकृत प्रक्रिया न पाळल्याचे ठोंबरे यांनी नमूद केले आहे.

नियमबाह्य कामाची सखोल चौकशी मुख्याधिकारी भूषण वर्मा, नगराध्यक्षा रेणूका पाटील आणि जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडून होणार का? दोषींवर गुन्हा दाखल होईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालिका प्रशासनाने या प्रकरणी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नगरपालिकेच्या हद्दीत पालिका संचलित शाळेत लाखो रुपयांचे काम सुरू असताना स्थानिक प्रशासनाला या बाबत काहीही माहिती नाही ही आश्चर्याची गोष्ट आहे. या प्रकाराची चौकशी होऊन कारवाई होईल का?

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!