सोशल मीडियावरची एक साधी ओळख, शिरपूर येथील तरुणीवर जळगाव च्या तरुणाचा लैंगिक अत्याचार
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव येथील एका तरुणाची धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील एका तरुणीची सोशल मीडियावर ओळख झाली आणि या ओळखीचे रुपांतर दिवसेंदिवस गोड गप्पा तून हळूहळू वाढलेली जवळीक आणि या जवळीकीतून तरुणीचे आयुष्य उध्वस्त झाले. या घटनेने मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील नेरी गावातील अमोल सवयलाल राठोड (रा. नेरी, ता. जामनेर) या तरुणाशी धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील एका तरुणीची सोशल मीडियावर ओळख झाली. रोजच संवाद, गोड गप्पा हलक्याफुलक्या विषयांपासून ते भावनिक जोड पर्यंत मजल मारता मारता अखेर तो दिवस उजाडला…
“आई मी शाळेत जाते””
नेरी येथील अमोल राठोड ने तिला १० जुलै रोजी जळगाव ला भेटण्यासाठी बोलावलं. “आई मी शाळेत जातेय…” असं सांगून ती घराबाहेर पडली. आणि बसने ती तरुणी जळगावला पोहोचली. जळगावात अमोल आणि त्याचा मित्र
मित्र राजू रोहीदास राठोड तिची वाट पाहत होते. अमोल मित्रासोबत तिला सोबत घेऊन गेला – आधी मित्राच्या घरी घेऊन गेला.
“थोडा वेळ बस”
तेथे मित्र आणि त्याची पत्नी नव्हते. एकटाच होता. तेव्हा “थोडा वेळ इथे थांब… मी लगेच येतो.”असे म्हणत मित्र व त्याची पत्नी कामानिमित्त बाहेर पडले होते. आणि त्याच वेळी अमोल तिच्यावर जबरदस्ती करू लागला.
मित्राच्या घरी तसेच एका घरात नेवून शिरपुर येथील मुलीवर जळगावात अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दि. १० रोजी उघडकीस आली. याप्रकरणी संशयित अमोल सवयलाल राठोड (रा. नेरी, ता. जामनेर) याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, धुळे जिल्ह्यातील शिरपुर येथील एक तरुणीचे इन्सटाग्रावर अमोल राठोड या तरुणासोबत ओळख झाली. त्यामुळे त्या तरुणीचे नियमीत तरुणासोबत फोनवर बोलणे सुरु होते. दि. १० जुलै रोजी सकाळी १० वाजता अमोल राठोड या तरुणाने तरुणीला जळगाव बस स्टॅण्वर भेटण्याकरीता बोलाविले होते. त्यावेळी तरुणीने मी शाळेत जाते असे सांगून अमोल राठोडला भेटण्याकरीता आली होती. यावेळी अमोल राठोड हा त्याचा मित्र राजू रोहीदास राठोड याच्यासोबत आला होता. त्यांनी तरुणीला राजू राठोडच्या घरी घेवून गेला होता. त्यावेळी राजू राठोड हा पत्नीसह कामानिमित्त बाहेर गेलेला असतांना अमोल राठोड याने तरुणीला शारिरीक संबंधासाठ जबरदस्ती करु लागला, परंतू तरुणीने त्यास नकार दिला होता.
त्याच दिवशी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास संशयित अमोल राठोड याने तरुणीला भाड्याने घेतलेल्या रुमवर घेवून गेला. त्याठिकाणी तरुणीच्या ईच्छेविरुद्ध त्याने अत्याचार केला. त्यानंतर तरुणीला त्याचा मित्र राजू राठोड याच्या घरी सोडून तो तेथून निघून गेला. घडलेला प्रकार तरुणीने अमोलचा मित्र राजू राठोड याला सांगितल्यानंतर त्याने तरुणीला मी तुला घरी सोडून देतो असे म्हणाला. त्यावेळी तरुणीने तिच्या मैत्रीणीला आपबिती सांगितल्यानंतर तीने तिचा ओळखीच्या एका तरुणाला तिला घेण्यासाठी पाठविल्यानंतर तरुणीने त्या तरुणाच्या घरी गेली
तरुणी जळगावात असल्याचे समजल्यानंतर तरुणीच्या नातेवाईक हे जळगावात आले. त्यांनी तरुणीला विश्वासात घेवून चौकशी केली असता, तरुणीने त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी लागलीच पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार संशयित अमोल सवयलाल राठोड (रा. नेरी, ता. जामनेर) याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास उपनिरीक्षक संजय तडवी हे करीत आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
