भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

रावेर तालुक्यात वाळू माफियांवर मोठी कारवाई : वाळूने भरलेल्या ट्रॉलीसह ट्रॅक्टर जप्त !

रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |नुकत्याच रुजू झालेल्या
यावल वन्यजीव पाल वनक्षेत्रपाल शितल नगराळे यांनी पदभार घेतल्या बरोबर दि. १२ रोजी गुप्त बातमीवरुन यावल अभयारण्यातील पाल वन्यजीव वनपरिक्षेत्रातील सुकी नदी येथे अवैधरित्या उत्खनन होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने आरोपी शब्बीर बलदार तडवी यास अटक करुन ट्रॅक्टर (एमएच-१९ जि बी ६९३०) वाळूने भरलेल्या ट्रॉलीसह जप्त केले. मुद्देमालासह एकूण नुकसानीची रक्कम २ लाख आहे. रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर वाळूची अवैध वाहतूक ट्रॅक्टर, डंपर, ट्रॅक द्वारे केली जात असते.

सदरची कार्यवाही उपवनसंरक्षक (वन्यजीव) कृष्णा भवर, सहाय्यक वनसंरक्षक सत्यजीत निकत व मंगेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे, वनपाल संभाजी सुर्यवंशी, प्रविण पाटील, वनरक्षक रोहिदास पाटील, जगदिश बारेला, संजय बारेला, रणधीर काटे, राजमल बारेला, सविता बारेला, सकिना तडवी, धनाबाई मादले, वनमजुर परमान तडवी, युसूफ खान यांनी केली. वनविभागाने वाळू माफियांवर कारवाई केल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!