ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयाच्या निंभोरा येथील विद्यार्थिनी ग्रामपंचायत तर्फे सन्मानित
निंभोरा, ता. रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील निंभोरा बु: येथील रहिवासी व ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयात शिकत असलेल्या निंभोरा येथील दोन विद्यार्थिनी निकिता समाधान कोळी बी.एस.सी (रसायनशास्त्र) व व मुस्कान मुनाफ पटेल बी ए (इतिहास) यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत यश संपादन केल्यामुळे. निंभोरा ग्रामपंचायत ने त्यांचा सत्कार केला.
दि. १७ रोजी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत सभागृहात सरपंच निर्मलाताई कोळी व उपसरपंच रंजना प्रशांत पाटील यांनी दोघ गुणवंत विद्यार्थिनींचा पुष्पगुच्छ व शाल, सन्मानपत्र व पेढा भरवत गुणगौरव केला. यावेळी सरपंच निर्मलाबाई कोळी यांनी या विद्यार्थिनी जळगाव धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये झळकल्याने त्याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे सांगितले अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्षावर मात करून यश संपादन करणाऱ्या दोन्ही विद्यार्थिनींचे ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.
यावेळी सरपंच निर्मलाबाई कोळी, उपसरपंच रंजनाताई पाटील यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य मंदाकिनी बऱ्हाटे, सौ शाहीन दस्तगीर खाटीक, मनोहर तायडे, युनूस मिस्तरी, मधुकर बिऱ्हाडे, संदीप महाले, ग्रामपंचायत कर्मचारी निलेश भंगाळे, राहुल महाले, ललित दोडके, विनोद गोराडकर, चंद्रकांत गवळी, श्रीकांत पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
