गो प्रेमींसाठी आनंदाची बातमी ! श्रीकृष्ण गो शाळेजवळ नगरपालिकेच्या सभागृहास मंजुरी- अमोल जावळे यांची गो प्रेमींना भेट
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर येथील श्रीकृष्ण गोशाळेजवळील नगरपालिकेच्या ओपन स्पेसमधील जागेत आधुनिक सभागृह उभारण्यास मंजुरी मिळाली असून, यामुळे परिसरातील गोप्रेमी तसेच सामाजिक संस्थांसाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.
आज वसुबारसच्या शुभमुहूर्तावर आमदार अमोलभाऊ जावळे यांनी गोप्रेमींना भेट देत सभागृह मंजुरीची माहिती दिली. त्यांच्या या निर्णयामुळे गोसेवा तसेच सामाजिक उपक्रमांना चालना मिळणार आहे.
हे सभागृह गोसेवा उपक्रम, कीर्तन-भजन, प्रबोधन सभा, योग प्रशिक्षण, आणि सामाजिक-शैक्षणिक उपक्रमांसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे परिसरातील गोप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी आमदार अमोलभाऊ जावळे म्हणाले की, “गोसेवा ही भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. अशा सेवाभावी कार्याला पायाभूत सुविधा देणे ही आपली जबाबदारी आहे.”

