क्राईममहाराष्ट्र

दोन वर्षांच्या बालिकेवर सावत्र बापाने लैंगिक अत्याचार करून हत्या

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l नात्यात अडथळा ठरत असल्याच्या रागातून एका नराधम सावत्र बापाने दोन वर्षांच्या सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मुंबई मधील मानखुर्द येथे घडली.

पोलिसां कडून मिळालेल्या माहितीनुसार, बापाने बालिकेच्या गुप्तांगात लाटणं घुसवून तिचा गळा आवळला. मुलीची आई घराबाहेर कामानिमित्त असताना सावत्र बापाने हा घृणास्पद प्रकार केला आहे. आरोपीने बालिकेच्या हत्येनंतर सर्व पुरावे मिटवण्याचाही प्रयत्न केला.

बालिकेच्या आईने पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर दोघी मायलेकी आरोपीबरोबर राहत होत्या. आरोपीला मुलगी नात्यात अडसर आहे असं सतत वाटत होते. त्यावरुन दोघांमध्ये वाद देखील होत होते. आरोपी बालिकेवर सतत राग राग करायचा. नेहमीप्रमाणे मुलीची आई कामानिमित्त घराबाहेर गेली. दुपारी जेव्हा ती घरी परतली तेव्हा मुलगी बेशुद्धावस्थेत होती.

आरोपी व मुलीच्या आईने तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी सांगितले की, तिच्या नाजूक भागावर काही जखमा होत्या. त्यामुळं त्यांनी मुलीच्या आईला याबाबत विचारलं. तेव्हा आरोपीने सांगितले की मुलगी खेळता खेळता पडली त्यामुळं जखमा झाल्या. हे प्रकरण संशयास्पद असल्याने पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता त्याने पोलिसांनाही तेच कारण सांगितले. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने मुलीवर अत्याचाराची आणि हत्येची कबुली दिली. मुलीच्या अंगावर मारहाणीच्या आणि गळा आवळल्याच्या खुणा आढळल्या. तिच्या नाजुक भागावरही जखमा होत्या. आरोपीवर मुंबई पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!