भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

नशिराबाद टोल नाक्या जवळ यावल तालुक्यातील महिलेचा बसच्या चाकाखाली चिरडून मृत्यू

जळगाव, मंडे टु मंडे न्युज| आज मंगळवार दिनाक २८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास नशिराबाद टोल नाक्याजवळ झालेल्या एका भीषण अपघातात एका महिला प्रवाशाचा बस खाली चिरडून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

अमळनेर आगाराची बस जळगावकडून भुसावळकडे वेगाने जात असताना बस नशिराबाद टोल नाक्याजवळ अचानक बसच्या समोरील चाकांपैकी एक टायर वेगात फुटले. त्यामुळे बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरकटलेली बस थेट टोल नाक्याजवळील एका भिंतीवर जाऊन आदळली. या अपघाताच्या धक्क्याने बसमध्ये बसलेली एक महिला प्रवासी खिडकीतून बाहेर फेकली गेली. दुर्दैवाने, ती महिला बसच्या मागील चाकाखाली येऊन यावल तालुक्यातील साराबाई गणेश भोई (वय ४६) रा. पाडळसा ता.यावल या महिलेचा चिरडून तिचा जागीच मृत्यू झाला. यावेळी परिसरात एकच खळबळ उडाली.

स्थानिक नागरिक आणि टोल नाक्याजवळील वाहनधारकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्याला सुरुवात केली. अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारी देखील त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मदत कार्य आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने कार्यवाही केली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी रुग्णालयात हलवण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!