भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

अबब : घरातून सोन्याचा धूर ; तब्बल १५ कोटींच्या सोन्याच्या विटा जप्त

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | अस म्हटलं जात भारतात सोन्याचा धूर निघत होता… खरं आहे ते…एका घरातून सोन्याचा धूर निघत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्याची आर्थिक राजधानी मुंबईत हा भयानक प्रकार सुरू होता. भारतात कित्येक शतकांपूर्वी सोन्याचा धूर निघत होता. याचा अर्थ आपला देश अत्यंत संपन्न असा होता. मात्र मुंबईत प्रत्यक्षात एका घरातून सोन्याचा धूर निघत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्याची आर्थिक राजधानी मुंबईत हा भयानक प्रकार सुरू होता.

१५ कोटींच्या विटा जप्त…                                            तस्करीद्वारे देशात येणारं सोनं मुंबईतील एका घरात वितळवण्याचं काम सुरू असल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील एका घरात या तस्करीच्या सोन्यापासून सोन्याच्या विटा आणि पावडर तयार केली जात होती. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे टाकलेल्या धाडीत केंद्रीय महसूल गुप्तचर अधिकाऱ्यांनी यंत्रणेच्या हा केला आहे. चार ठिकाणी छापेमारी करीत तब्बल ११ जणांना अटक करुन त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याशिवाय १५ कोटींचं सोनं जप्त करण्यात आलं आहे. सोबतच अधिकाऱ्यांनी सोनं वितळवण्यासाठी वापरल्या कारखाना उद्ध्वस्त जाणाऱ्या भट्टया उध्वस्त करत बार किंवा विटा तयार करण्यासाठीचं सर्व साहित्य जप्त केलं आहे. एवढंच नाही तर आणखी कुठे कुठे असे कारखाने सुरू आहेत, याचाही शोध घेतला जात आहे.

सोन्याच्या तस्करीचं मोठ्या वाढतं प्रमाण… गेल्या काही वर्षात सोन्याच्या तस्करीचं प्रमाण अधिकच वाढलं गेलं आहे. गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. परिणामी विमानतळावरही संख्येने सोन्याची तस्करी केली जात असल्याचं बोललं जातं आहे. एकूणच काय तर राज्याची राजकीय व आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील एका घरातून अचानक निघणाऱ्या तस्करीतून आलेल्या सोन्याच्या धुरामुळे मोठी घबराट निर्माण झाली होती एवढं मात्र खरं

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!