भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

लाखोंची रोकड जप्त, न.पा. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावेर मध्ये मोठी कारवाई

रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | नगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून उमेदवारी अर्ज भरणे सुरू झाले आहेत.आचारसंहिता लागू झाल्याने याच पार्श्वभूमीवर स्थिर सर्वेक्षण पथके तैनात करण्यात आली असून या पथकाकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. अशातच रावेरमध्ये स्थिर सर्वेक्षण पथकाने मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यातील ही पहिली मोठी कारवाई असून या कारवाईत २ लाख ५६ हजार रुपयांची रोकड जप्त केली. सावदा रोडवरील शासकीय विश्रामगृहासमोर ही कारवाई करण्यात आली.

राज्यात आचारसहितां लागू झाल्याने  न.पा. निवडणुकीच्या अनुषंगाने बऱ्हाणपूर  -अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर सावद्याकडून येणाऱ्या वाहनांची शासकीय नवीन विश्रामगृहा समोर स्थापन करण्यात आलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकाकडून तपासणी सुरू होती. याचदरम्यान एमएच १९ सीएफ २३८५ या क्रमांकाच्या वाहनाची तपासणी करण्यात आली. वाहनामध्ये २ लाख ५६ हजारांची रोख रक्कम आढळली. वाहनधारक कुशल सुनील अग्रवाल (रा. वरणगाव रोड, भुसावळ) यांनी ही रक्कम बऱ्हाणपूर येथे सोयाबीन खरेदीसाठी नेत असल्याचे सांगितले. मात्र त्याबाबत कोणतेही दस्तऐवज सादर करू शकले नाहीत. त्यामुळे पथकाकडून पंचनामा करून रोकड जप्त करण्यात आली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार बंडू कापसे आणि पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या उपस्थितीत करण्यात आली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सतीश पुदाके यांनी सीलबंद रक्कम जिल्हा कोषागारात जमा केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!