पाच हजारांची लाच घेताना लिपिकासह कंत्राटी कर्मचारी एसीबी च्या ताब्यात
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |जळगाव महानगरपालिकेतील अनामत रक्कम परत मिळवून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या लिपिकासह कंत्राटी शहर समन्वयकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव युनिटने रंगेहात पकडले. ही कारवाई आज, १९ ऑगस्ट रोजी सापळा रचून करण्यात आली
यातील तक्रारदार हे ४८ वर्षीय पुरुष असून यांची कर सल्लागार संस्था असुन त्यांना एका संस्थेला नविन बसस्थानक, जळगाव येथील नव्याने बांधलेले आधुनिक वातानुकुलीत सार्वजनीक शौचालय पे अँन्ड युज तत्वावर चालविणेकरिता टेंडर भरणे व त्या संबधीत काम तक्रारदार हे करीत होते. त्याप्रमाणे दि. ४ एप्रिल २०२५ रोजी सदर संस्थेतर्फे नविन बस स्थानक जळगाव येथील नव्याने बांधलेले आधुनिक वातानुकुलीत सार्वजनीक शौचालय पे अँन्ड युज तत्वावर चालविणेकरिता मिळणेकामी महानगरपालीका जळगाव येथे टेंडर दाखल केले होते.
तसेच टेंडर करिता ३५ हजार रुपये अनामत रक्कम डी.डी.द्वारे महानगर पालीकेस भरली होती. परंतु सदरचे टेंडर सदर संस्थेला मिळाले नाही. म्हणुन टेंडर मिळणेकरिता भरलेली ३५ हजार रुपये अनामत रक्कम परत मिळणेकरिता अर्ज तयार करून सदरचा अर्ज तक्रारदार यांनी दि. २९ जुलै २०२५ रोजी महानगरपालीका जळगाव येथे जमा करून अनामत रक्कमेच्या कामा संदर्भात श्री. आनंद चांदेकर, लिपीक, महानगरपालीका जळगाव यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी सदरची ३५ हजार रुपये अनामत रक्कम परत मिळुन देण्याकरिता तक्रारदार यांचेकडे ५ हजार रुपयांची मागणी केली होती.
तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याबाबत तक्रारदार यांनी दि. १९ ऑगस्ट २५ रोजी ला.प्र.विभाग, जळगांव येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारीप्रमाणे दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी लाचमागणी पडताळणी केली असता आनंद जनार्दन चांदेकर, यांनी तक्रारदार यांचेकडे महानगरपालीकेत भरलेली अनामत रक्कम मिळुन देण्याकरीता ५००० रुपये लाचेची मागणी केली व सदरची लाचेची रक्कम राजेश पाटील यांचेकडे देण्यास सांगितली. त्याचवेळी राजेश रमण पाटील यांनी आनंद चांदेकर, लिपीक, यांचेकरीता ,५ हजार रू. लाचेची मागणी केली. त्यानंतर सापळा कारवाईदरम्यान तक्रारदार हे आनंद जनार्दन चांदेकर यांना भेटले असता त्यांनी मागणी केल्याप्रमाणे दिनांक १९ ऑगस्ट रोजी पंचांसमक्ष लाचेची रक्कम टेबलावर ठेवण्यास सांगुन स्वतः स्विकारली. म्हणून चांदेकर यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
त्या नुसार १) आनंद जनार्दन चांदेकर, वय- ३७ वर्ष, व्यवसाय – नोकरी, लिपिक, महानगरपालिका जळगाव. राह. देविदास कॉलनी पंचमुखी हनुमान नगर च्या मागे, जळगाव. ( वर्ग ३). २) राजेश रमण पाटील, वय ३५ वर्षे, व्यवसाय- नोकरी (शहर समन्वयक), मनपा, जळगाव. कंत्राटी कर्मचारी. रा.प्लाॅट नं.८, भुषण काॅलनी, गिरणा टाकीजवळ, जळगांव. यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कारवाई पर्यवेक्षण अधिकारी श्री. योगेश ठाकूर,
पोलिस उप अधिक्षक, ला.प्र.वि., जळगांव. सापळा व तपास अधिकारी श्री. हेमंत नागरे,पोलिस निरीक्षक , ला.प्र.वि. जळगांव. GPSI/ सुरेश पाटील (चालक) पोना/बाळू मराठे, पोकाँ/ भूषण पाटील.यांनी केली.

