भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

थरारनाट्य….पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून धावत्या रेल्वे खाली उडी घेऊन पतीची आत्महत्या

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | किरकोळ कारणावरून पती – पत्नी मध्ये वाद होऊन पतीने दारूच्या नशेत पत्नीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करून स्वतः धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी १९ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता जळगाव तालुक्यातील बोरनार येथे घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आनंदा महारू धनगर वय ४२ हे आपल्या पत्नी रेखा आणि विनोद आणि पप्पू या दोन मुलांसह जळगाव तालुक्यातील बोरनार येथील प्लॉट एरिया परिसरात राहतात.

आज मंगळवार १९ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता आंनदा यांचे पत्नी रेखासोबत किरकोळ वाद झाला. हा किरकोळ वाद विकोपाला जाऊन वाढतच जात असताना या वादातून आनंदाने त्याची पत्नी रेखा वर लोखंडी कुऱ्हाडीने सपासप वार केले. या हल्ल्यात रेखा धनगर गंभीर जखमी झाल्या त्यांना लागलीच खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती मात्र चिंताजनक आहे.

आनंदा धनगर यांनी पत्नीवर हल्ला केल्यानंतर लागलीच सकाळी ७ वाजता थेट म्हसावद रेल्वे गेटजवळ धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली.या संदर्भात जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!