आ. चंद्रकांत पाटील यांच्या वाहनांचा अपघात
मुक्ताईनगर, अक्षय काठोके | आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाहनाला त्यांच्या ताफ्यातील गाडी मागून धडकल्याने अपघात दोन पोलिस कर्मचारी किरकोळ मुका मार लागला आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आमदार चंद्रकांत पाटील मतदार संघात फिरत असताना त्यांच्याच ताफ्यातील पोलीस वाहनाने कुंड -घोडसगाव रस्त्यादरम्यान आमदार चंद्रकांत पाटलांचा वाहनाला मागून धडक दिल्यामुळे अपघात झाला यात आमदार पाटील यांच्या वाहनाचे मागील बाजूने तर पोलीस वाहनाचे पुढील बाजूने थोडे नुकसान झाले आहे.
यात आमदार चंद्रकांत पाटलांसह दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले त्यांच्यावर मुक्ताईनगर येथील खाजगी रुग्णालयात प्रथमोपचार होऊन सुट्टी देण्यात आली शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा आमदार चंद्रकांत पाटील हे घरी आराम करीत असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे त्यांच्यातर्फे सांगण्यात आले