Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेरसावदा

संशयास्पदरित्या ट्रकच्या बॅटऱ्या चोरून नेणारा आरोपी सावदा पोलिसांच्या जाळ्यात, ७१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त

सावदा. ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज |सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांनी संशयास्पदरीत्या गोणपाट घेऊन मोटारसायकलवरून जात असलेल्या दोघांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांना हुलकावणी देऊन पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांपैकी एकाला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीच्या तीन ट्रक बॅटऱ्या आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


ही कारवाई २७ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेपासून २८ ऑगस्ट रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत सुरू असलेल्या रात्रगस्ती दरम्यान करण्यात आली. सावदा पोलीस ठाण्याचे कर्मचारी व होमगार्ड हतनूर धरणाकडून हतनूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पेट्रोलिंग करत होते.


संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांचा पाठलाग
रात्री सुमारे १.३० वाजता उदळी गावाच्या बसस्थानकाजवळ पोलिसांना सीबीझेड एक्स्ट्रीम मोटारसायकलवरून दोन इसम गोणपाट घेऊन संशयास्पदरीत्या जाताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. मात्र, दोघांनी पोलिसांना हुलकावणी देत पळून जाण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी तत्काळ त्यांचा पाठलाग केला. रात्री सुमारे १.४५ वाजता पोलिसांनी त्यांना गाठले. यावेळी मोटारसायकल चालवणारा इसम अंधाराचा फायदा घेत गल्लीबोळातून पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र, मोटारसायकलच्या मागे बसलेल्या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले.


बॅटऱ्यांबाबत समाधानकारक उत्तर नाही
ताब्यात घेतलेल्या इसमाची चौकशी केली असता त्याने मोटारसायकलवरील गोणपाटात असलेल्या ट्रकच्या बॅटऱ्यांबाबत समाधानकारक माहिती दिली नाही. पोलिसांना सदर बॅटऱ्या जळगाव शहरातील रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकमधून काढून आणल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्या ताब्यात घेतल्या.


ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव विशाल शांताराम कोळी (वय २८, रा. कडगाव, ता. यावल, जि. जळगाव) असे आहे. तर त्याच्यासोबत असलेला मोहन प्रकाश कोळी (रा. कडगाव, ता. यावल) हा फरार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे.


७१ हजारांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी केलेल्या कारवाईत खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला—
MH-19-BF-9347 क्रमांकाची काळ्या रंगाची सीबीझेड एक्स्ट्रीम मोटारसायकल — ₹५०,०००
QUICK START WF1000 कंपनीची ट्रक बॅटरी — ₹७,०००
REVOLT AUTOMATIC BATTERY कंपनीची ट्रक बॅटरी — ₹७,०००
GLOBAL KP25K कंपनीची ट्रक बॅटरी — ₹७,०००
असा एकूण ₹७१,००० किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

गुन्हा दाखल
याप्रकरणी पोलीस कर्मचारी सुनील जानकिराम कुरकुरे यांच्या फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात FIR क्र. ०२२२/२०२६, मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सावदा पोलीस करीत आहेत.


ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, पोहेका/ अक्षय हिरोळे, पोलीस कर्मचारी सुनील कुरकुरे, संजय तडवी तसेच होमगार्ड प्रशांत पाटील व संतोष सपकाळे यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!