जिल्हाधिकारी कार्यालय व रावेर पंचायत समिती कडून कृती आराखडा बैठक मोहमांडली येथे संपन्न
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आज दिनांक २२/०१/२०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व गटविकास अधिकारी पंचायत समिती रावेर यांच्या मार्गदर्शनाखाली पेसा ग्रामपंचायत मोहमांडली येथे जळगाव जिल्हा कन्वर्जन समीती व सामुहिक वनहक्क व्यवस्थापन व संवर्धन समीती मार्फत शासकीय अधिकारी व ग्रामस्थ यांच्या समन्वयातून कृती आराखडा बैठक संपन्न झाली.
पेसा ग्रामपंचायत मोहमांडली येथील ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या विविध समस्या व अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यात प्रामुख्याने वनदावे, सामुदायिक वनहक्क, गावातील दळणवळणाची साधने, रस्ते, शाळा, रोजगार, आरोग्य, कृषी आधारित समस्या, सांस्कृतिक, पारंपरिक, शैक्षणिक, आर्थिक बाबतीत जिल्ह्यातील विविध शासकीय अधिकारी यांनी तोडगा काढण्यासाठी गावकऱ्यांकडून विविध समस्यांबाबत माहिती जाणून घेतली व अडचणी सोडविण्यासाठी शतप्रतिशत सहकार्य करण्याचे ही ठराव या बैठकी दरम्यान करण्यात आला.
गावाचा शाश्वत विकास व बेरोजगारी साठी विविध उपाययोजना तसेच आरोग्य बाबतीत सुदृढता, शिक्षणासाठी दळणवळणाची साधने व गाव/पाड्यातील ईको टुरिझम ची व्यवस्था आणि रोजगार बाबत सखोल चर्चा व मार्ग काढण्यात आले.
नियोजन बैठकीचे उद्घाटन राजेंद्र फेगडे (सहा.गटविकास अधिकारी पं.स. रावेर) व स्वप्निल फटांगळे (RFO यावल पुर्व) यांच्या हस्ते क्रांतीसुर्य विर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून करण्यात आले.
या विशेष बैठकीकरिता जिल्ह्यातील; युनुस तडवी (सहा.अधिकारी प्रकल्प कार्यालय आदिवासी विकास विभाग यावल), राजेंद्र फेगडे (सहा.गटविकास अधिकारी, पं.स.रावेर), अंजली राठोड (वन परिमंडळ यावल पुर्व), विलास कोळी (गटशिक्षण अधिकारी पं.स.रावेर), महेश पाटील (प्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव), रमेश वानखेडे (उप.अभियंता ग्रा.पा.पु.रावेर), डॉ .धिरज नेहते (KVK पाल), ललित इंगळे (मंडळ अधिकारी तहसील रावेर), राहूल पाटील(उमेद अभियान पं.स.रावेर), विनोद पाटील (सा.बां.विभाग सावदा), निलेश धांडे (मंडळ अधिकारी रावेर), एस.एस.सपकाळे (घरकुल विभाग पं.स.रावेर), मिलिंद देशपांडे (कौशल्य विकास अधिकारी, जळगाव), श्रीकांत लांबोळे (सल्लागार, भारत सरकार), प्रविण शिंदे (विस्तार अधिकारी पं.स.रावेर) सचिन धांडे (लोक समन्वय सहायक संस्था), संजय महाजन (लोक समन्वय सहायक संस्था), दिपक भोये (क.अभि.ग्रा.पा.पु. उपविभाग रावेर), आर.पी.वानखेडे (उप.अभि.ग्रा.पा.पु. रावेर), बी.आर.पाटील (क.अभि.ग्रा.पा.पु. उपविभाग रावेर), जगदिश वळवी (खादी ग्रामोद्योग कार्यालय, जळगाव), भुषण पाटील (कृषी विभाग, पं.स.रावेर), पी.टी.पाटील (वनपाल, रावेर), प्रदिप बावीस्कर (जिल्हा व्यवस्थापक, पेसा कक्ष जि .प.जळगाव), शरद सपकाळे (तालुका व्यवस्थापक, पेसा कक्ष पं.स.चोपडा), मोहमांडली गावाचे सरपंच रजिया तडवी, उपसरपंच कुरबान तडवी, ग्रा.पं.सदस्य जुम्मा तडवी, शहाबीर तडवी, सलीम तडवी, मुस्तफा तडवी, पोलिस पाटील बिलाल तडवी व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युनुस तडवी पेसा व्यवस्थापक पं.स.रावेर यांनी केले तर आभार ग्रामपंचायत अधिकारी महेंद्र पवार यांनी केले.