‘ब्राम्हणांचा तुला मत्सर! कोणरे तू ? तू तर मच्छर…. पवारांविरोधात केतकी चितळेची पोस्ट, गुन्हा दाखल !
ठाणे, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : आपल्या सोशल मीडिया पोस्टसाठी नेहमी चर्चेत असणारी मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) पुन्हा एकदा प्रकाश जोतात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांबाबत (Sharad Pawar) आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वाद ग्रस्त पोस्ट मुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अभिनेत्री केतकी चितळे हीनं केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये असे लिहिलंय आहे की..
तुका म्हणे पवारा | नको उडवू तोंडाचा फवारा ||
ऐंशी झाले आता उरक | वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे | सतरा वेळा लाळ गळे ||
समर्थांचे काढतो माप | ते तर तुझ्या बापाचेही बाप ||
ब्राह्मणांचा तुला मत्सर | कोणरे तू ? तू तर मच्छर ||
भरला तुझा पापघडा | गप! नाही तर होईल राडा ||
खाऊन फुकटचं घबाड | वाकडं झालं तुझं थोबाड ||
याला ओरबाड त्याला ओरबाड | तू तर लबाडांचा लबाड ||
केतकीनं आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन एक पोस्ट केली आहे. अॅड. नितीन भावे यांची ही कविता असून ती तिनं आपल्या वॉलवर पोस्ट केली आहे. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी साताऱ्यातील एका सभेमध्ये जवाहर राठोड यांची एक कविता ‘डोंगराचे ढोल’ या संग्रहातील ‘पाथरवट’ ही कविता लोकांसमोर सादर केली होती. त्याचा संदर्भ केतकीच्या पोस्टला आहे. या कवितेच्या माध्यामातून त्यांनी ब्राह्मण समाज आणि हिंदू देवदेवतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा सूर भाजपनं आळवला तर, तिथे केतकीनंही पवारांच्या याच सादरीकरणारा निशाणा केल्याचा अंदाज नेटकरी बांधत आहेत.
अभिनेत्री केतकी चितळेला शरद पवारांचा विरोधात पोस्ट केल्यावरुन ट्रोलही केलं जात आहे. याआधीही वेगवेगळ्या वादग्रस्त पोस्टमुळे केतकी चितळे चर्चेत आली होती. दरम्यान, आता केलेल्या पोस्टमुळे केतकी चितळेविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वकील नितीन भावे यांनी लिहिलेले कविता केतरी चितळे यांनी फेसबुकवरुन शेअर केली आहे. याआधीही केतकी चितळेने केलेल्या पोस्टमुळे वादात सापडली होती. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलही तिने वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर ती वादात सापडली होती. त्यावेळीही शिवप्रेमींनी तिला ट्रोल केले होतं. त्यामुळे तिच्यावर एट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली होती. तर आता शरद पवारांविरोधात केलेल्या पोस्टनंतर तिच्यावर कळवा पोलीस स्थानका गुन्हा दाखल करण्यात आलाय.