क्राईमजळगाव

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार, तरुणीची तक्रार

जळगाव,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर लैंगिक अत्याचार केला व नंतर मात्र लग्न करण्यास नकार दिल्याची घटना जळगाव शहरात घडली. तरुणीने विकास प्रकाश अडकमोल याच्या विरोधात तक्रार केली असून जळगाव एम आय डी सी पोलीसस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकास प्रकाश अडकमोल रा. गेंदालाल मिल. जळगाव याने ओळखीचा फायदा घेत तरुणीशी जवळीक निर्माण करून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिने लग्ना बद्दल विचारले असता त्याने लग्नास नकार दिल्याने तरुणीने अखेर तिने जळगाव एम आय डी सी पोलीसस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दयानंद सरवदे करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!