क्राईममहाराष्ट्र

देशी दारू व बियरबार वर कारवाई करणार नाही, ११ हजारांची लाच घेताना दारूबंदी अधिकाऱ्याला अटक

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्य उत्पादन शुल्क सहाय्यक दुय्यम निरीक्षक, भरारी पथक ( दारू बंदी अधिकारी) देशी दारू व बियर बार कारवाई करणार नाही च्या मोबदल्यात ११ हजार रुपयांची मागणी करून ती रक्कम स्वीकारताना दुय्यम निरीक्षकाला रंगेहाथ पकडुन अटक केली.

यातील २५ वर्षीय तक्रारदार हे शासनमान्य देशी दारू विक्रेते असून त्यांचा व्यवसाय सुरळीत चालू देण्यासाठी व त्यांचे बियर बार परमिट रूम वर कायदेशीर कार्यवाही न करण्याच्या मोबदल्यात राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकातील अधिकारी खलील खुर्चीत शेख सहाय्यक दुय्यम निरीक्षक कोपरगाव यांनी दि. ०२/०५/२०२४ रोजी ११००० रुपयांची मागणी करून आज रोजी ती रक्कम ११०००/- रुपये लाच घेताना, खलील खुर्शीद शेख, सहाय्यक दुय्यम निरीक्षक. नेमणुक- श्रीरामपूर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक. वय ४०वर्षे, रा. खडकी रोड, चर्चचे समोर ,कोपरगाव. ता. कोपरगाव जिल्हा- अहमदनगर. याना रंगेहाथ पकडले असून यांचे विरुद्ध कोपरगाव पोलीस स्टेशन, येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सदरची कारवाई सापळा व तपास अधिकारी -श्रीमती गायत्री मधुकर जाधव, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नाशिक. सापळा पथक पोलीस हवालदार संदीप वणवे, पोलीस हवालदार ज्योती शार्दुल. यांनी केली

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!