भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

सावदा येथील कृषी कन्यांकडून शेतकर्‍यांना स्वच्छ दुध उत्पादनाचे प्रात्यक्षिक

सावदा, ता.रावेर.मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | डॉ उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थिंनी गौरी भोसले, नेहा खोडपे ,सुजाता काळे,माधुरी सपकाळे या कृषीकन्या यांनी प्राचार्य डॉ.शैलेश तायडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. बी.एम गोणशेटवाड,कार्यक्रम अधिकारी डॉ.मोनिका एस भावसार आणि विषयाचे विशेष तज्ज्ञ डॉ एम. एस. गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ दुध उत्पादनाचे शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले.

गोठ्याची स्वच्छता :- गोठा कोरडा, हवा खेळता आणि स्वच्छ ठेवावा, शेण व कचरा नियमितकाढावा, माशा व किटक होणार नाहीत याची काळजी घ्यावी.

जनावरांची स्वच्छताः-दूध काढण्यापूर्वी कास, शेपटी आणि शरीराची स्वच्छता करावी.

दूध काढण्याची पद्धतः- संपूर्ण मुठ पद्धतीने ७-८ मिनिटांत दूध काढावे, हात स्वच्छ असावेत.

भांड्यांची स्वच्छताः– दूध काढण्याची भांडी निर्जंतुक असावीत, निमुळत्या तोंडाची भांडी वापरावीत आणि दूध काढल्यावर लगेच गाळून थंड करावे.

आरोग्यः- जनावरांना वेळेवर लसीकरण आणि पशुवैद्यकीय तपासणी करावी. या क्षेत्रात सरकारी प्रोत्साहन, तंत्रज्ञानाचा (एआय), आणि नवीन प्रकल्प येत आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल अशी आशा आहे.

अशी सर्व माहीती आम्ही शेतकर्‍यांना दिली.
आणि त्यांच्या कृषी कन्या ना चांगला सहभाग लाभला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!