भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

फैजपूर रस्त्यावरील अवैध तोडलेल्या “त्या” महाकाय वृक्षाचा पंचनामा करून साठवलेला लाकूड साठा गायब ….कर्मचाऱ्यांनी विकला तर नाही ना?

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | फैजपूर येथील फैजपूर – सावदा रोड वरील हिरो होंडा शोरुम च्या बाहेरील लिंब जातीच्या हिरवेगार डोलदार झाड अवैध तोडण्यात आले होते. त्या झाडाच्या लाकडांचा भला मोठा ढीग तेथेच बाहेर लावण्यात आला होता. वनविभागाच्या फैजपूर येथील परिमंडळाचे वन पालक यांच्या देखरेखीखाली पंचनामा करून जमा केलेला हा लिंबाचा लाकूड साठा यातील काही लाकूड साठा गायब झालेला आहे. यावर कोणाचीही देखरेख नाही.

फैजपूर वनविभागाचे परिमंडळ येथील वन कर्मचाऱ्यांनी सात ते आठ महिन्या अगोदर नॅशनल हायवे रोडवरील हिरो होंडा शोरूम समोरील हिरवेगार डोलेदार महाकाय झाड अवैधरीत्या तोडण्यात आले होते या झाड तोडी प्रकरणी कुठलीही परवानगी संमती नॅशनल हायवे यांच्याकडून घेतलेली नाही म्हणून हे झाड अवैधरित्या तोडण्यात आल्याने याचा पंचनामा वनविभागाचे परिमंडळाचे फैजपूर येथील वन कर्मचाऱ्यांनी करून हिरो होंडा शोरूम समोर ढीग लाऊन जमा करून ठेवलेला होता त्यातील फक्त आणि फक्त पाच मोठे मोठे लाकडं राहिले आहे. बाकीचा सर्व लाकूड तिथून गायब करण्यात आलेला आहे.

या बाबत अधिक चौकशी केली असता की त्या झाडांचा जेवढा लाकुड फाटा तिथे जमा केलेला होता तो सर्व वनविभागाच्या कोण्या कर्मचाऱ्यांनी कोण्यातरी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला विकून टाकला असल्याची माहिती मिळत असून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली जात असून संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!