अहमदनगरात बेड, रेमडीसेव्हीर, ऑक्सिजनचा तुटवडा; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन!
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
अहमदनगर (शुभांगी माने)। अहमदनगर मध्ये ऑक्सिजनचा तुटवडा,कोव्हिड रूग्णांकरिता बेडची अनुप्लब्धता,रेमडीसेव्हीर इंजेक्शन मिळत नसल्याने कोव्हिड रूग्णांचे जीवन धोक्यात आले आहे,या मुळे रुग्णाच्या मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या संदर्भात अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालया समोर आज धरणे आंदोलन करण्यात आले ,या धरणे आंदोलनातुन जिल्हा प्रशासनाला नागरिकांद्वारे जाब विचारण्यात आला.
या आंदोलनामध्ये नगरमधील सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन कोव्हिड रूग्णांच्या व्यथा प्रशासनासमोर मांडल्या. हेच प्रश्न घेऊन तीन दिवसांपूर्वी अशाच प्रकारचे आंदोलनाद्वारे कोव्हिड रूग्णांकरिता सेवा सुरळितपणे चालाव्या अशी विनंती करण्या आली होती तरी देखील प्रशासनाने योग्य दखल न घेतल्याने आज दि.20 एप्रिल 2021 रोजी पुन्हा सामाजिक संस्था तसेच नागरिकांनी सुविधा मिळाव्यात म्हणून धरणे आंदोलन केले.आंदोलनात रेमेडीसीबिर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड, चाचणी व रिपोर्ट मिळण्यासाठी तरसणारे रुग्ण व नातेवाईक, ज्यांचे या अनास्थेने बळी गेले आणि जात आहेत, अशा रुग्णांचे परिवार, संवेदनशील नागरिक यांनी स्वयंसेवी संस्था महासंघ यांच्यासोबत आंदोलनात सहभाग नोंदवला. ऑक्सिजन अभावी दवाखान्यातुन कोव्हिड रूग्ण हलवण्याचे डाॅक्टर सांगत आहे अशा परिस्थिताचा सामना कोव्हिड रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी कसा करावा हा सद्यस्थितीतील सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.