ऐनपुर येथे मरीमाता यात्रोत्सव साजरा; बारा गाड्यां ओढण्याचा कार्यक्रम सपन्न
ऐनपुर,मंडे टू मंडे न्युज,विजय के अवसरमल। ऐनपुर येथे मरीमाता यात्रोत्सव साजरा करण्यात आला, अक्षय तृतीयेच्या पाडव्या निमित्त ऐनपूर येथे वर्षानुवर्षे चालत आलेला बाऱ्या गाड्यांचा कार्यक्रम आज दिनांक ४ मे रोजी शांततेत पार पडला. ऐनपूर येथे अक्षय तृतीया पाडव्या निमित्त मरिमातेच्या बारागाड्या ओढण्यात आल्या.
बारागाड्यांच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. तसेच यानिमित्ताने यात्रेचे आयोजन करण्यात आले. साधारण दोन ते अडीच वर्षांपासून संपूर्ण जगात करोनाने थैमान घातले होते. त्यामुळे सर्व सण उत्सवांवर बंदी घालण्यात आली होती. परंतु करोनाचा धोका पूर्णतः कमी झाल्याने शासनाने लावलेले निर्बंध उठवण्यात आल्याने बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शतकोत्तर वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेला दोन वर्षांच्या खंडानंतर पहील्यांदाच ऐनपुर गावातील तथा पंचक्रोशीतील अबालवृध्द बालबालिका व नागरीकांनी सहभागी होऊन यात्रेचा आनंद घेतला .बारा गाड्या ओढण्याचे काम वर्षानुवर्षे भगत नामदेव भिल्ल हे करीत असुन या वर्षी सुध्दा हा मान त्यांनाच मिळाला. त्यांना सहकार्य म्हणून बगले सुनिल महाजन व सतिष अवसरमल यांची साथ होती.
यावेळी ऐनपुर येथील पोलिस पाटील दिपाली तायडे सरपंच अमोल महाजन यांनी बारा गाड्या ची पुजा केली यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष जगन्नाथ शामू पाटील, भगवान महाजन, रघुनाथ पाटील , मिलिंद अवसरमल, विलास अवसरमल, सुनिल महाजन, निलेश जैस्वाल, कमलेश महाजन, माजी पं. स.सदस्य दिपक पाटील, छोटु पाटील, निंभोरा सरपंच सचिन महाले ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी,तसेच पत्रकार विजय एस अवसरमल, विजय के अवसरमल, इक्बाल पिंजारी, श्रीराम पाटील, ज्ञानेश्वर महाजन, तसेच गावातील व परिसरातील नागरिक उपस्थित होते यावेळी निंभोरा पोलीस स्टेशन चे सहा.पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ ,यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ.ज्ञानेश्वर चौधरी,बापु पाटील,किरण जाधव तसेच होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त राखला तसेच यात्रेनिमित्त गावात तमाशाचे आयोजन करण्यात आले होते.