भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

रावेर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ शिवराय पाटील अखेर पदमुक्त…

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

ऐनपुर, ता.रावेर, विजय के अवसरमल। तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ शिवराय पाटील यांच्या कडून अखेर तालुका वैद्यकीय अधिकारी या पदाचा पदभार काढण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या तालुका वैद्यकीय अधिकारी पदाचा तिढा अखेर सुटला असून पदाचा कार्यभार डॉ शिवराय पाटील यांच्या कडून काढण्यात आला आहे त्यांच्या जागेवर एम बी बी एस अर्हता धारक सेवाज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ विजया झोपे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तालुका वैद्यकीय अधिकारी पदावर तालुक्यात एम बी बी एस वैद्यकीय पदवी अर्हता धारक सेवाज्येष्ठ डॉक्टर सेवेत असतात डॉ शिवराय पाटील यांनी केलेली नियुक्ती ही बेकायदा व नियमबाह्य असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी केली होती
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांनी गांभिर्याने दखल घेत लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ शिवराय पाटील यांच्या कडून तालुका वैद्यकीय अधिकारी पदाचा पदभार काढून खिरोदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ विजया झोपे यांचेकडे सोपवण्याचे आदेश पारीत केले आहेत
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भिमाशंकर जमादार यांनी आदेश जारी केले आहेत

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!