भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

धक्कादायक : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आजोबाने बनवलं नातीलाच वासनेची शिकार

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आजोबानेच नातीला वासनेची शिकार बनऊन मुलगी नऊ महिन्यांची गरोदर राहिल्याची व नात्याला काळिमा फासणारी घटना अकोला जिल्ह्यात घडली. चुलत आजोबाने नातीवर सलग अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

गेल्या वर्षभरापासून आजोबा तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार करण्यात येत होता. या पीडित मुलीला शेजारच्या महिलेने देखील ब्लॅकमेल करत एका तरुणांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करायला भाग पाडलं. या धक्कादायक प्रकारामुळे मुलगी गरोदर राहिली. सद्यस्थितीत पीडित मुलीचे वय १८ असून ती ९ महिन्याची गरोदर आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन पीडित मुलीचे तिच्या ५० वर्षीय आजोबाने आंघोळ करतानाचे फोटो काढले. त्यानंतर या आजोबाने कारमध्ये नेत ब्लॅकमेल करून फोटो व्हायरल करण्याची धमक दिली. त्यानंतर या आरोपीने पीडित मुलीवर बळजबरीने अनेकदा अत्याचार केले. तसेच त्या सोबत शेजारी राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेने सुद्धा तिला ब्लॅकमेल करत एका २३ वर्षीय तरुणासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडलं.  शहरातीच  मलकापूरभाग  आणि इतर ठिकाणी तिच्या अत्याचार झाला. हा धक्कादायक प्रकार वर्षभरा पासून सुरु होता.

मुलगी गरोदर राहिल्याने कुटुंबीयांना घटना समजली. या घटनेनंतर कुटुंबीय भयभयीत झाले. दरम्यान, पीडित मुलीला सातत्याने बदनामीची धमकी देण्यात येत होती. काही दिवसानंतर पीडित मुलीची मोठी बहीण घरी आली, त्यानंतर तिने हा प्रकार बहिणीला सांगितला. बदनामीच्या भीतीमुळे आई-वडिलांनी मुलीला बहिणीसोबत बाहेरगावी पाठवून दिले होते. मुलगी गरोदर राहिल्याने कुटुंबीयांना तक्रार न करण्यासाठी जीवे मारणे आणि बदनामीची धमकी दिली जात होती.

शेवटी पीडित मुलीच्या कुटुबीयांनी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी आजोबा,शेजारील महिला व २३ वर्षीय तरुण या तिघांविरुद्ध खदान पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला. या प्रकरणी आरोपींवर बाल संरक्षण कायदा अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी पोलिसांकडून चुलत आजोबा, व  ब्लॅकमेल करणारी महिला याना ताब्यात घेण्यात आले असून २३ वर्षीय तरुणाचा तपास सुरु आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असून  या प्रकरणाचा तपास खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!