जळगावप्रशासनराजकीय

लोकसभा निवडणूक : पहिल्याच दिवशी रावेर साठी १३ उमेदवारांनी ४४ तर जळगाव साठी १३ उमेदवारांनी २९ घेतले अर्ज

जळगांव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l २०२४ लोकसभा निवडणूक ची अर्ज दाखल करण्याची सूचना प्रसिद्ध होताच पहिल्याच दिवशी दिनांक १८ एप्रिल रोजी ०४ रावेर लोकसभा मतदारसंघासाठी १३ उमेदवारांनी ४४ अर्ज घेतले.
तर ०३ जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी १३ उमेदवारांनी २९ अर्ज घेतले. तर पहिल्या दिवशी जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.

रावेर लोकसभा मतदार संघ

निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयातून ०३ रावेर लोकसभा मतदारसंघासाठी १३ उमेदवारांनी ४४ अर्ज घेतले आहेत. त्यात डी डी वाणी, ( फोटोग्राफर) रावेर ( अपक्ष)४ अर्ज, जितेंद्र पांडुरंग पाटील थोरगव्हाण तालुका यावल ( अपक्ष)४ अर्ज , अमित हरिभाऊ कोलते मलकापूर जि. बुलढाणा ( अपक्ष)३ अर्ज, रमेश रंगनाथ साळवे, अनिल नगर भुसावळ( पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक) ३ अर्ज , शेख राऊत शेख युसुफ, रा. खडका ता.भुसावळ ( अपक्ष) २ अर्ज, प्रवीण लक्ष्मण पाटील, रा. मलकापूर. जि. बुलढाणा ( अपक्ष)२ अर्ज, संजय प्रल्हाद कांडेकर,भोईवाडा,मुक्ताईनगर( अपक्ष)४ अर्ज, तुषार किसन राणे रा. सालबर्डी ता. मुक्ताईनगर यांनी श्रीमती रक्षा निखिल खडसे, कोथळी, ता. मुक्ताईनगर ( भारतीय जनता पार्टी)४ अर्ज, राहुल रॉय अशोक मुळे, किन्ही ता. जामनेर (अपक्ष )४ अर्ज, ऍड. नामदेव पांडुरंग कोळी, रा. असोदा ता. जळगांव ( अखिल भारतीय हिंदू महासभा)४ अर्ज, अ. आरिफ अ. गनी, जाम मोहल्ला, भुसावळ (अपक्ष )४ अर्ज, गुलाब दयाराम भिल, खडगाव ता. चोपडा ( भारत आदिवासी पार्टी)२ अर्ज, अनिल पितांबर वाघ, जळगाव, (अपक्ष ) ४ अर्ज असे एकूण १३ उमेदवारांनी ४४ अर्ज घेतले आहेत.

जळगाव लोकसभा मतदार संघ

निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयातून ०३ जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी १३ उमेदवारांनी २९ अर्ज घेतले आहेत. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी गणेश कौतिकराव ढेंगे, अनुराग स्टेट बँक कॉलनी जळगाव या अपक्ष उमेदवाराने स्वतःसाठी २ अर्ज, संजय एकनाथ माळी हनुमान नगर,धरणगाव (अपक्ष) २अर्ज, डीडी वाणी फोटोग्राफर रावेर( अपक्ष) २ अर्ज, भरत पंढरीनाथ सपकाळे, वाल्मिक नगर जळगाव( बहुजन समाज पार्टी) ३ अर्ज, ललित गौरीशंकर शर्मा, पोलन पेठ जळगाव( अपक्ष) ४ अर्ज, ललित गौरीशंकर शर्मा पोलन पेठ जळगाव यांनी सुरेश पांडुरंग पाटील पांडव नगरी पाचोरा यांच्यासाठी( हिंदुस्तान जनता पार्टी) ४ अर्ज, ईश्वर दयाराम मोरे,राधाकृष्ण नगर जळगाव ( सैनिक समाज पार्टी)१, ऍड.गोविंद जानकीराम तिवारी ( हिंदू महासभा)२ अर्ज, संदीप युवराज पाटील, प्रताप नगर गलवाडे रोड अमळनेर( अपक्ष) २ अर्ज, संदीप युवराज पाटील यांनी श्रीमती अश्विनी गोरख पाटील गलवाडे तालुका अमळनेर( अपक्ष) यांचे साठी २ अर्ज, योगेश सुखदेवराव बाविस्कर, आसोदा तालुका जळगाव यांनी महेंद्र देवराम कोळी कळमसरा तालुका अमळनेर( प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी) यांच्यासाठी १ अर्ज, विजय भीमराव निकम, पिंप्राळा हुडको ( अपक्ष) २ अर्ज. मोहन सोमा जोगी, सबगव्हाण तालुका पारोळा( अपक्ष) २ अर्ज असे एकूण १३ उमेदवारांनी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी २९ नामनिर्देशन अर्ज घेतले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!