सावदा पोलिस स्टेशनचे विशाल पाटील यांची बदली, आर्थिक गुन्हे शाखेचे गणेश फड यांची सावदा येथे नियुक्ती
जिल्ह्यातील दोन निरीक्षक व आठ सहा.निरीक्षकांच्या बदल्या
जळगाव, मंडे टु मंडे न्युज | जळगाव जिल्हा पोलीस दलात पुन्हा मोठे बदल करण्यात आले असून दलातील दोन पोलीस निरीक्षक व अन्य आठ सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केल्या आहेत. काही पोलिस ठाण्यात पद रिक्त असल्याने या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गुरुवार दिनाक २५ जून रोजी काढले.
सावदा पोलिस स्टेशनचे प्रभारी विशाल पुंडलिक पाटील यांची बदली करण्यात येऊन त्यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांचे रिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या रिक्त जागी आर्थिक गुन्हे शाखेचे गणेश फड यांची सावदा पोलिस स्टेशनला प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे राहुल भाऊसाहेब भंडारे यांची भुसावळ शहर वाहतूक शाखेच्या प्रभारीपदी तर रामानंदनगरचे निलेश राजपूत यांची एमआयडीसी ठाण्यात नियुक्त्ती करण्यात आली आहे.
अडावद पोलिस ठाण्यातील प्रभारी प्रमोद वाघ यांची जळगाव आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. धरणगावचे उपनिरीक्षक संतोष काशीनाथ पवार यांची गुन्हे शाखेत तर एटीबीचे सुनील शामकांत पाटील यांची डायल 112 येथे बदली करण्यात आली
जिल्ह्यात चार नवे अधिकारी
जिल्ह्यात चार नवीन अधिकारी आले असून नव्याने बदलून आलेल्या एपीआय विजय श्रीकृष्ण माळी यांची भुसावळ शहर ठाण्यात तर फोर्सवनचे एपीआय सुनील बापू कदम यांची धरणगाव ठाण्यात नियुक्ती करण्यात आली. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक कृष्णा वासुदेव पाटील यांची एमआयडीसी ठाण्यात तर उपनिरीक्षक निवांत जयजितसिंह जाधव यांची बाजारपेठ ठाण्यात बदली करण्यात आली.
तर एका सहाय्यक निरीक्षकांसह तीन उपनिरीक्षकांच्या विनंती वरून बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात एमआयडीसी ठाण्याचे एपीआय माधुरी बोरसे यांची मानव संसाधन विभागात बदली करण्यात आली. एमआयडीसी उपनिरीक्षक मो. अली सत्तार अली यांची भुसावळ बाजारपेठ ठाण्यात बाजारपेठ ठाण्यात तर बाजारपेठच्या भारती सागर काळे यांची चाळीसगाव ग्रामीण ठाण्यात व डायल 112 चे दीपक प्रभाकर जगदाळे यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

