अमळनेरक्राईम

अमळनेर शहरात दगडफेक, संचारबंदीचे आदेश, तालुक्यातील गावांमध्ये शुकशुकाट

अमळनेर, जि. जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। काल दि.९ रोज शुक्रवारी रात्री १० वाजता अमळनेर शहरातील जिनगर गल्ली आणि सराफ बाजार परिसरात दोन गटांत हाणामारी होऊन दगडफेक झाली. सराफ बाजार परिसर व्यापाऱ्यांचा असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.पोलिसांनी घटनेवर नियंत्रण मिळवले असून प्रांताधिकारी कैलास कडलक यांनी सोमवारी सकाळपर्यंत संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. आजूबाजूच्या गावांमध्ये शुकशुकाट पसरला आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राकेशसिंग परदेशी, पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी हजर झाले. लहान मुलांच्या भांडणातून दंगल झाल्याचा अंदाज आहे. दगडफेकीचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळले.काही ठिकाणी तोडफोड झाल्याचे दिसून येत आहे. पोलिस दंगलीमागील संशयितांचा शोध घेत आहेत. अफवांवर विश्वास न ठेवता शांततेचे आवाहन केले आहे. दरम्यान,घटना घडल्यानंतर सकाळी प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी शनिवारी १० जून रोजी सकाळी ११ वाजेपासून ते सोमवारी १२ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत संचारबंदीच्या आदेश लागू केले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!