शरद पवार यांना धमकी देणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, मुक्ताईनगर राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांना राजकारण महाराष्ट्राचे नर्मदाबाई पटवर्धन’ या नावाने असलेल्या ट्विटर अकाऊंट जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार आहे,’ असं ट्विट या अकाऊंटवरुन करण्यात आले आहे,ट्विट करणाऱ्या व्यक्तीला अटक करून त्याची सखोल चौकशी करून यामागचा मास्टर माईंड शोधण्यात यावा शरद पवार साहेबांची सुरक्षा वाढविण्यात येऊन त्यांना एकेरी शब्दात अपशब्द बोलून समाजात तेढ निर्माण करणारे वनमंत्री ना सुधिर मुनगंटीवार, आ गोपीचंद पडळकर,आ नितेश राणे यांनी पदाचा राजीनामा द्यावा या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस तर्फ़े मुक्ताईनगर तहसीलदार आणि मुक्ताईनगर पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले
यावेळी मुक्ताई सह सूतगिरणी अध्यक्षा रोहिणी खडसे
जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, राजिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे,तालुका अध्यक्ष यु डी पाटील सर,विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार,शहराध्यक्ष राजेंद्र माळी,बाजार समिती सभापती सुधिर तराळ,प्रवक्ता सेल संयोजक विशाल महाराज खोले, रामभाऊ पाटील,किशोर चौधरी,मधुकर गोसावी,रविंद्र दांडगे,प्रविण पाटील, बापु ससाणे, एजाज खान,बाळा भालशंकर,विकास पाटील,नंदकिशोर हिरोळे,रउफ खान,सुनिल पाटील,भावराव पाटील,सोनु पाटील, प्रविण दामोदरे, प्रदिप साळुंखे, संजय कपले,विशाल रोटे,राहुल पाटील,निलेश भालेराव,हाशम शहा, अय्याज पटेल, मुश्ताक मण्यार,जुबेर अली फिरोज सैय्यद ,वहाब खान, अख्तर मण्यार, हर्षल झोपे, प्रभाकर झोपे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय संरक्षण, कृषी मंत्री, माजी मुख्यमंत्री शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे दैवत असून आमच्या या दैवताला राजकारण महाराष्ट्राचे नर्मदाबाई पटवर्धन’ या नावाने असलेल्या ट्विटर अकाऊंट वरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार आहे,’ असं ट्विट या अकाऊंटवरुन करण्यात आलं आहे, देशाचे संरक्षण मंत्री राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवार साहेबांसारख्या व्यक्तीला खुलेआमपणे जिवे मारण्याची धमकी मिळत आहे यावरून राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे हे लक्षात येते, तरी लवकरात लवकर सदर ट्विटर अकाऊंट चालकास अटक करून त्याची सखोल चौकशी करण्यात यावी व यामागील मास्टर माईंड शोधून काढण्यात यावव त्यांच्या सुरक्षतेत वाढ करण्यात यावी पवार साहेबांना काहीही धोका पोहोचल्यास त्यास केंद्रीय आणि राज्याचे गृह खाते जबाबदार राहील, शरद पवार साहेबांना धमकी देणाऱ्या अपप्रवृत्तीचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी जाहीर निषेध करीत असून संविधानिक पदावर असणाऱ्या या व्यक्तींनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुक्ताईनगर तर्फे करण्यात आली

