भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

अमळनेरजळगाव

इंदूरहून अमळनेरकडे येणारी बस नर्मदा नदीत कोसळली; १३ प्रवाशांचा मृत्यू

जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : मध्यप्रदेश राज्यातील धार जिल्ह्यातील खालघट संजय सेतू इथे मोठी दुर्घटना घडली आहे. इंदूरवरून अमळनेर येथे येणारी अमळनेर डेपोची बस ही मध्यप्रदेशातील खरगोन आणि धार जिल्ह्याच्या सीमेनजीक नर्मदा नदीत कोसळली असून ४० पेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणारी एसटी महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला असून १५ जणांना वाचवण्यात यश आल आहे.

अमळनेर एसटी डेपोची बसचा नंबर MH 40 N9848 इंदूर येथून रिटर्न प्रवासात खरगोन आणि धार या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असणार्‍या कलघाट गावाजवळ नर्मदा नदीच्या पात्रात ही बस कोसळली. यात सुमारे ४० वर प्रवासी असून यातील काही प्रवासी बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सोमवारी सकाळी १० वाजण्याचा सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही बस इंदूरहून पुण्याकडे निघाली होती. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे.

दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने मदत व बचाव कार्य सुरू केलं. खरगोन धारचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकानीही घटनास्थळाला भेट दिली. पोलीस अधीक्षक धर्मवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार १३ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर १५ जण जखमी अवस्थेत आढळले. बाहेर काढण्यात आलेल्या प्रवाशांपैकी ५ ते ७ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बातमी अपडेट करत आहेत

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!