जळगाव जिल्ह्यात पाचशे रुपयांच्या बनावट नोटा जप्त
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव जिल्ह्यातील
अमळनेर शहरात ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या दोन संशयितांना अमळनेर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या कडून दहा हजार किमतीच्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून त्यांच्या कडून दुचाकी, दोन मोबाईल असा एक लाख आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाला सह दोघांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, अमळनेर शहरातील पैलाड भागात दोन जण नकली नोटा चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्या नुसार पथकाने भोला टेलर यांच्या दुकानाजवळ कैलास शिवराम भाई, वय २८, रा. इहदरी ता कफराड जि.बलसाड, वसंत कालसिंग मुलकाशा, वय २३, रा. कावडझिरी ता.धारणी, जि.अमरावती .या दोघांना ताब्यात घेत त्यांच्या कडून दहा हजार रुपये किमतीच्या ५०० रुपयांच्या नकली नोटा आढळल्याने त्या जप्त केल्या. तसेच दुचाकी क्र. एम.एच.२७, डीसी ७०५३ व दोन मोबाइल असा एकूण १ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.