भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमचाळीसगाव

कार मधून ६० कोटींचा “अँफेटामाईन” ड्रग्ज साठा जप्त, मोठ्या रॅकेटचा संशय

चाळीसगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात तब्बल ३९ किलो ‘अँफेटामाईन’ नावाचा ‘ ड्रग’ हा अंमली पदार्थ २५ जुलै शुक्रवार रोजी संध्याकाळच्या सुमारास महामार्ग पोलिसांनी मोठी कारवाई करत जप्त केला. या जप्त केलेल्या ड्रग्ज ची अंतरराष्ट्रीय बाजारात आजचा बाजारभाव अंदाजे ६० कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

दिनाक २५ जुलै रोजी संध्याकाळी धुळ्याहून छत्रपती संभाजीनगर कडे जात असलेल्या ब्रेझा कारला महामार्ग पोलिसांनी कन्नड घाटात थांबवले. चालकाकडे प्राथमिक चौकशीत वाहनाची आवश्यक कागदपत्रे नसल्याचे आढळले.

त्या नंतर त्याची चौकशी करत त्या कारची तपासणी करण्यात आली. कारची सखोल तपासणी करीत असताना तपासणी दरम्यान कारच्या मागील बाजूस ठेवलेल्या दोन बॅगांमध्ये काहीतरी विशेष असल्याचा संशय बळावला. या बॅगांची तपासणी केली असता तपासणी दरम्यान या बॅगांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड मागणी असणारे “अँफेटामाईन” नावाचे तब्बल ३९ किलो ड्रग्ज असल्याचे निष्पन्न झाले. या ड्रग ची किंमत आजच्या बाजार भावाने सुमारे अंदाजे ६० कोटी रुपये असून पोलिसांनी तत्काळ हा संपूर्ण साठा जप्त करत चालकाला ताब्यात घेऊन चालका विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणा मागे मोठे ड्रग रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. केली आहे.

दरम्यान, या मोठ्या ६० कोटी रुपये बाजारभाव असलेल्या ३९ किलो ड्रग्ज साठ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. महेश्वर रेड्डी यांनी रात्री उशिरा चाळीसगावला भेट देत अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतल्याची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!