भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

“अमृत भारत स्टेशन योजना”१०३ पुनर्विकसित अमृत स्थानकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन, “सावदा रेल्वे स्थानक पुनर्विकसित”

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | बिकानेर (राजस्थान) येथून पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी जी यांनी “अमृत भारत स्टेशन योजना” अंतर्गत पुनर्विकसित १०३ रेल्वे स्थानकाचे दुरदृष्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. तसेच बिकानेर -मुंबई एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी रावेर लोकसभा अंतर्गत सावदा रेल्वे स्टेशन येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, ह्या आमदार अमोल हरिभाऊ जावळे, जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद व भुसावळ रेल्वे मंडळ व्यवस्थापक श्रीमती इती पांडे यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. तसेच यावेळी परिसरातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशातील रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये सतत सुधारणा आणि वाढ करण्याच्या मोदी सरकार च्या वचनबद्धतेनुसार, पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी भारतातील १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ८६ जिल्ह्यांमध्ये १,१०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चून विकसित केलेल्या १०३ पुनर्विकसित अमृत स्थानकांचे उद्घाटन केले. अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत प्रादेशिक वास्तुकला प्रतिबिंबित करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुविधा वाढवण्यासाठी रचना केलेल्या १,३०० हून अधिक स्थानकांचा आधुनिक सुविधांसह पुनर्विकास केला जात आहे. भारतातील पुनर्विकसित अमृत स्थानके आधुनिक पायाभूत सुविधांसह सांस्कृतिक वारसा, दिव्यांगजनांसाठी असलेल्या सुविधांसह प्रवासी-केंद्रित सुविधा आणि प्रवासाचा अनुभव वाढविण्यासाठी शाश्वत पद्धतींचा समावेश करतात.

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी २६.०२.२०२४ रोजी सावदा स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली – एकूण प्रकल्प खर्च ८.११ कोटी , प्रवाशांच्या सोयी, सुलभता आणि स्वच्छता यावर लक्ष केंद्रित करून सावदा स्थानक पुनर्विकसित करण्यात आले आहे.

सावदा स्टेशन वर पूर्ण केलेली कामे :
१. पब्लिक एड्रेस सिस्टम (एएनटीईएस आधारित)
२. कोच डिस्प्ले बोर्ड
३. प्लॅटफॉर्म क्रमांक इंडिकेटर बोर्ड
४. शौचालय महिला ०२ – प्रत्येक प्लॅटफॉर्मवर एक
५. शौचालय पुरुष ०२ – प्रत्येक प्लॅटफॉर्मवर एक
६. शौचालय अपंग ०२ – प्रत्येक प्लॅटफॉर्म वर एक
७. प्लॅटफॉर्म १ वर एक वॉटर कूलर
८. स्टील बेंच नवीन एकूण १६ नग (तीन प्रवाशांना बसण्यासाठी एक बेंच)
९. सामान्य दुसऱ्या श्रेणीतील प्रवाशांसाठी प्रतीक्षा कक्ष
१०. स्टेनलेस स्टील डस्टबिन एकूण ८ नग
११. प्लॅटफॉर्म पृष्ठभाग ग्रॅनाइट फिटिंग्ज
१२. फुट ओव्हर ब्रिज (पत्री शेड सह)

अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत या स्थानकांचा पुनर्विकास हा प्रवाशांच्या अनुभवात वाढ, सुलभता आणि शहरी परिदृश्याशी एकात्मता यातील एक परिवर्तनकारी पाऊल आहे. आधुनिक, समावेशक आणि प्रवासी-केंद्रित रेल्वे पायाभूत सुविधांच्या पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाला साकार करण्यात भारतीय रेल्वे महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!