कत्तली आधीच गोवैशांची सुटका, यावल पोलिसांची कारवाई
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | यावल फैजपूर रोडवर सांगवी बस स्टॉप जवळ अवैधरीत्या गुरांची कत्तल करण्याचे उद्देशाने अवैधरित्या गुरांची वाहतूक करीत असताना पोलिसांनी १ छोटा हत्ती वाहन रोखून कारवाई करून त्यातील जरसी जातीचे २ गोधन मनवेल येथील गो शाळेत रवाना केले या कारवाईमुळे अवैधरित्या गुरांची वाहतूक करून कट्टर करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली.
बुधवार दि.२१ मे रोजी सकाळी फैजपुर कडून यावल कडे रस्त्यांने सांगवी बस स्टॉफ जवळ एक माल वाहतुक चारचाकी वाहन ( छोटा हत्ती पिकअप वाहन ) क्र. MH.०४. EY.२११८ ने अवैधरीत्या गुंराची कत्तल करण्याचे उद्देशाने अवैधरित्या गुंराची वाहतुक करीत असताना वाहनाची तपासणी केली असता वाहनात गोवंश जातीची २ जनावरे त्यांना पुरेसा चारा पाण्याची व्यवस्था न करता, त्यांना पुरेशा श्वासोच्छावासाची मोकळी जागा न ठेवता,अत्यंत दयनीय अवस्थेत वाहनात कोंबुन कत्तल करण्याचे उद्देशाने वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने वाहन चालक मो.अदनान सगीर कुरेशी वय १९ रा इस्लामपुरा. सावदा ता. रावेर जि जळगाव. तसेच तसेच गुरे घेणारा मालक हमीद झुम्मा तडवी रा.परसाडे ता.यावल जि.जळगाव या दोघांना यावल पोलिसांनी ताब्यात घेतले.
वाहनात मिळून आलेले गोवश जातीचे २ जनावरे
वर्णन खालील प्रमाणे.
पन्नास हजार रुपये किमतीची एक फिक्कट पांढऱ्या रंगाची टाटा कंपनीची छोटा हत्ती चार चाकी क्र.MH-०४- EY २११८ , बारा हजार रुपये किमतीची लाल रंगाची जर्सी जातीची व शिंगे मध्यम वय अंदाजे दहा वर्ष असलेली शेपटीचा गोंडा काळा असलेली जरसी गाय, पंधरा हजार रुपये किमतीची काळा रंगाचे जर्सी क्रॉस ब्रेड शिंगे लांब वय अंदाजे आठ वर्ष असलेली शेपटीचा गोंडा पांढरा असलेली गाय अशा एकूण ७७ हजार रुपये किमतीचा पंचनामा करून पोलिसांनी माल ताब्यात घेतला व पुढील कारवाई करून चालक अदनान सगीर कुरेशी वय १९, राहणारी इस्लामपुरा सावदा, गुरे घेणारे मालक आम्ही जुम्मा तडवी राहणार पडसाडे तालुका यावल यांचे विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

