भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

अंगणवाडी सेविकांना निवृत्तीवेतन, सेवानिवृत्ती उपदान व लाडकी बहिण योजनेचा प्रोत्साहन भत्ता द्यावा- आ. खडसे यांची विधानपरिषदेत मागणी

नागपूर,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून विधानपरिषद सभागृहात आ एकनाथराव खडसे यांनी राज्यातील अंगणवाडी सेविकांना निवृत्तीवेतन, सेवानिवृत्ती उपदान व मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा प्रोत्साहन भत्ता वितरीत करण्या बाबत प्रश्न उपस्थित केला यावेळी ते म्हणाले

राज्यातील अंगणवाडी सेविकांना निवृत्तीवेतन, सेवानिवृत्ती उपदान व लाडकी बहिण योजनेचा प्रोत्साहन भत्ता वितरीत करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाला पाठविण्यात आला आहे मात्र या प्रस्तावाबाबत अद्यापही वित्त विभागाने कोणताही निर्णय घेतला नसल्याने सदरहू प्रस्ताव प्रलंबित असल्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या व सेवानिवृत्त होणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे माहे ऑक्टोबर, २०२५ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे,


राज्यासह जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनीही सेवानिवृत्ती उपदान, निवृत्तीवेतन व इतर मागण्यासंदर्भात दिनांक २६ ऑगस्ट, २०२५ रोजी वा त्यासुमारास जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा आंदोलन केले
राज्यासह जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना निवृत्तीवेतन, सेवानिवृत्ती उपदान व लाडकी बहिण योजनेचा प्रोत्साहन भत्ता वितरीत करण्याबाबतच्या प्रस्तावास तातडीने मान्यता देण्यात यावी व याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे याची माहिती द्यावी अशी मागणी आ एकनाथराव खडसे यांनी केली

त्यावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर देताना सांगितले एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवानिवृत्तीनंतर एक रकमी लाभाच्या योजनेंतर्गत लाभ देण्यात येतो.

जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी पेन्शन, सेवानिवृत्ती उपदान मिळणेबाबत मागणी केलेली आहे. राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या पेन्शन व सेवानिवृत्ती उपदान प्रस्तावाबाबत शासन स्तरावर विचारविनिमय सुरू आहे. तसेच अंगणवाडी सेविकांना लाडकी बहिण योजनेंतर्गत अनुज्ञेय प्रोत्साहन भत्ता देण्यात आला असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!