मावस काकाचा साडू च्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, कुटुंबियांनी केला गर्भपात
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या मुलीसोबत तिच्या मावस काकाने( मावशीच्या पतीने) २०२५ छ्या मे जून दरम्यान वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून त्यातून ती मुलगी गरोदर राहिली. ही घटना पाचोरा तालुक्यातील एका गावात घडली.
पाचोरा तालुक्यातील एका गावातील विद्यार्थिनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असून २०२५ च्या मे-जून महिन्यात तिच्यावर शारीरिक अत्याचार केला या आधीही
सन २०१९ साली (कोन गाव,) कल्याण जवळीक कोन या गावी ती सातवीत असतानाही तिचा मावस काका प्रवीण इंगळे (रा. कोन गाव, कल्याण जि. ठाणे) याने विनयभंग करून तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केला त्या अत्याचारातून ही तरुणी गर्भवती राहिली.
सदरचा प्रकार तिच्या कुटुंबीयांना समजताच तिची आई, आजी, बाबा, काका यांनी पाचोर्यातील एका डॉक्टरांकडे जाऊन तिचा गर्भपात करून घेतला. या प्रकरणी सदर तरुणीने पाचोरा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार करणारा मावस काका, आई, काका, आजी, बाबा यांच्याविरोधात पाचोरा पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
