भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

पुन्हा अपघात : फैजपूर – भुसावळ रस्त्यावर आमोदा गावाजवळ दुचाकींची समोरासमोर धडक, एक गंभीर

फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | यावल तालुक्यातील आमोदा गावाजवळ गेल्या काही दिवसांपासून अपघात होत आहेत.अपघाताची मालिका सुरूच आहे. ६ जुलै रविवार रोजी सकाळी प्रवाशांनी भरलेली खाजगी बस पुलाचा कठडा तोडून नदी पात्रात पलटली. तर रात्री साडे नऊ वाजता आमोदा गावा जवळ दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात दोन जण जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,प्लेटिना दुचाकी (क्र. MH 19 DJ 4425) ही फैजपूरहून बामणोदकडे जात होती. तर होंडा कंपनीची दुचाकी (क्र. MH 19 – 5697) ही भुसावळकडून येत होती, या दोन्ही दुचाकी गाड्यांची आमोदा गावाजवळ समोरासमोर धडक झाली. त्यात जमील तडवी रा. फैजपूर हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला तत्काल भुसावळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून कल्पेश महाजन . रा. बामणोद. याला देखील फैजपूर येथील खाचणे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!