भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्रातील “या” जिल्ह्यांसह राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यात बहुतांश भागात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. ७ जुलै रोजी देखील हवामान विभागानं राज्यातील सर्वच भागांत पावसाची शक्यता वर्तवली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची हवामान विभागानं वर्तवली आहे. तर धुळे, नंदुरबार आणि नाशिक घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढताना दिसून येत आहे. मुंबईत काही ठिकाणी, कोकण विभागातील ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी या दोन जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा या दोन्ही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर घाटमाथा परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली या सर्व जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

संभाजीनगर चा विचार केला तर, छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या सर्व जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बीड, लातूर, धाराशिव या तीन जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!