भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

मोठी बातमी : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज : १० दिवस आधीच मान्सून च आगमन

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | शेतकऱ्यांसाठी व उकड्याने हैराण झालेल्या व घामाने चिंब झालेल्या नागरिकांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा ८ ते १० दिवस आधीच मान्सून च आगमन होणार आहे. मान्सून १३ मे पर्यंत अंदमनात- निकोबार दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

दरवर्षी मान्सून अंदामान- निकोबार बेटावर १८ ते २२ मेच्या सुमारास येतो. पण यावर्षी तो १० दिवस आधीच दाखल होणार आहे. महत्वाचे म्हणजे, अंदमान- निकोबार बेटांवर मान्सूनच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. हवेचे दाब कमी झाल्याने मान्सूच्या हालचालींना वेग आल्याचे सांगण्यात आले आहे. सलग ५० दिवस चाललेल्या उष्णतेचा परिणाम झाल्याने मान्सून यावर्षी १० दिवस आधी अंदमान- निकोबार मध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गतवर्षीदेखील १९ मे रोजी मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला होता.

एल निनोचा यंदा प्रभाव नसल्याने आणि ला निना सारख्या अनुकूल वातावरणामुळे पावसाचे प्रमाण चांगले राहील, असे हवामान खात्याने सांगितले. यावर्षी देशामध्ये १०५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. मान्सून अंदमानमध्ये दाखल झाल्यानंतर पुढच्ये ५ ते ६ दिवसांत तो केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!